LIVE Updates : ठाकरेंना पुन्हा झटका, विधीमंडळ कामकाज समितीत शिंदे गटाच्या मंत्र्यांची वर्णी

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 10, 2022, 23:58 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा

  21:55 (IST)

  खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता, आज सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचं ऑप्शन मागितलं, सरकारी निवासस्थानाबद्दलही प्रत्येक मंत्र्याकडून दोन ते तीन बंगल्यांचं ऑप्शन मागितलं, कुणाला कुठलं खातं द्यायचं आणि कुठला बंगला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेणार

  20:42 (IST)

  - विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटाच्या सदस्यांएैवजी आता शिंदे गटाचे सदस्यांची नेमणूक करण्यात आलीय

  - कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे यांची नेमणूक करण्यात आलीय.

  20:15 (IST)

  विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटाच्या सदस्यांऐवजी आता शिंदे गटाच्या सदस्यांची नेमणूक

  20:12 (IST)

  उद्या सकाळी 9 वाजता शिंदे गटाचे सर्व मंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतिस्थळावर अभिवादनासाठी जाणार

  19:38 (IST)
  पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केल्याची सूचना बँकेला प्राप्त, दि.21 सप्टेंबर 2022 पर्यंत जैसे स्थिती असणार, दरम्यानच्या काळात ठेवीदार आणि सेवकांना विश्वासात घेऊन, वैधानिक सल्ला घेऊन पुढची दिशा ठरवणार - सीए सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बँक
   
  18:48 (IST)

  266 किलो गांजा जप्त, 4 जण ताब्यात
  ऐरोलीत नार्कोटिक्स सेल वांद्रे युनिटची कारवाई

  18:47 (IST)

  - मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी
  - नार्कोटिक्स सेल बांद्रा युनिटचा होता सापळा
  - 266 किलो गांजा पकडला
  - 4 ड्रग पेडलर्स ताब्यात
  - 66 लाख 50 हजाराचा हा साठा
  - ऐरोली जंक्शन जवळ पकडला साठा

  18:42 (IST)

  पुण्यातील रुपी बँकेचं अस्तित्व संपणार
  रिझर्व्ह बँकेकडून रुपी बँकेचा परवाना रद्द

  18:40 (IST)

  कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर पुराचं पाणी
  नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स