LIVE Updates : अहमदनगर जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 18, 2023, 15:31 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 8 DAYS AGO

  हाइलाइट्स

  16:30 (IST)

  संगमनेर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाचा हजेरी. चांदनापुरी, साकुरसह अनेक गावात गारपिटसह जोरदार पाऊस. अनेक पिकांना फटका. हातातोंडाशी आलेले अनेक पिके धोक्यात. कांदा, टोमॅटो, मिरची सह झेंडूला अवकाळी पावसाचा फटका.

  12:13 (IST)

  बागेश्वर बाबांचा मीरारोडमध्ये कार्यक्रम
  बाबांच्या कार्यक्रमाविरोधात 'अंनिस'ची तक्रार
  कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस
  कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं - पोलीस
  धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य नको - पोलीस
  कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई - पोलीस

  12:13 (IST)

  बागेश्वर बाबांचा मीरारोडमध्ये कार्यक्रम
  बाबांच्या कार्यक्रमाविरोधात 'अंनिस'ची तक्रार
  कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस
  कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं - पोलीस
  धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य नको - पोलीस
  कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई - पोलीस

  11:54 (IST)

  शेतकऱ्यांच्या परतीसाठी एसटीच्या 15 बसेस
  शेतकऱ्यांसाठी एक रेल्वेही केली आरक्षित
  दुपारनंतर शेतकरी नाशिकला रवाना होणार

  11:20 (IST)

  ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
  जिल्हाधिकाऱ्यांची जे.पी. गावितांसोबत चर्चा
  जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची प्रत दिली - गावित
  शेतकऱ्यांचा लॉंग मार्च स्थगित - गावित
  शेतकरी नेते जे.पी. गावित यांची घोषणा
  सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य - गावित

  11:10 (IST)

  शेतकऱ्यांचा किसान लॉंग मार्च स्थगित
  शेतकरी नेते जे.पी. गावित यांची घोषणा
  70% मागण्या सरकारकडून मान्य - गावित
  निवेदन शेतकऱ्यांना वाचून दाखवणार - गावित

  8:25 (IST)

  राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध
  टीझरमुळे गुढीपाडवा मेळाव्याची उत्सुकता वाढली 

  6:28 (IST)


  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस 
  जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत संप
  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका
  संपामुळे आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर,रुग्णांचे हाल

  ाराज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स