LIVE Updates : आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 55 लाखांचा गंडा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 20, 2023, 15:06 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:27 (IST)
    नागपुरात जी-20 अंतर्गत C-20 या जागतिक परिषदेचं उद‌्घाटन, 227 प्रतिनिधी सहभागी झाले होते, एनजीओ आणि स्वयंसेवी संस्था झाल्या सहभागी, माता अमृतानंदमयी देवी आणि नोबल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी विचार मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विचार मांडत नागपूर नगरीचं महत्त्व, या परिषदेच्या विचारमंथनातून जगाच्या कल्याणासाठीचा सार निघेल असा व्यक्त केला विश्वास
     
    18:50 (IST)

    सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना दिलासा नाही, मुंबई सत्र न्यायालयानं याचिका फेटाळली

    18:43 (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत निवेदन
    'कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक'
    समिती अहवालानंतर उचित निर्णय घेणार - शिंदे

    कर्मचाऱ्यांचा संप मागे ही आनंदाची बाब - फडणवीस
    कर्मचाऱ्यांबाबत आडमुठेपणा नाही - देवेंद्र फडणवीस
    समितीला अहवालासाठी 3 महिन्यांची मुदत - फडणवीस
    समितीच्या अहवालानंतर पुढची कार्यवाही - फडणवीस

    16:50 (IST)

    जुन्या पेन्शन संपाबाबत सर्वात मोठी बातमी
    राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
    मुख्यमंत्री - शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
    कर्मचाऱ्यांचा 7 दिवसांपासून सुरू होता संप
    मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मिटला
    उद्यापासून कामावर हजर राहण्याचं आवाहन
    जुनी पेन्शन योजना निश्चित सुरू होणार
    संपकऱ्यांना गेलेल्या नोटिसा मागे घेणार
    लेखी आश्वासन मिळालं - विश्वास काटकर
    'सरकारच्या समितीला सहकार्य करणार'

    15:35 (IST)
    परराज्यातून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीचा पुण्यात रिक्षाचालकाकडून विनयभंग, आरोपीला पोलिसांनी जेजुरीतून केली अटक
     
    15:33 (IST)

    '28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामील होणार'
    राजपत्रित अधिकाऱ्यांचा सरकारला इशारा
    मुख्यमंत्र्यांसोबत बैठक यशस्वी - सूत्रांची माहिती
    राज्यभरात राज्यपत्रित अधिकारी दीड लाखाजवळ
    संघटना संप मागे घेण्याची घोषणा करणार?

    14:51 (IST)

    खासदार संजय राऊतांचे हक्कभंग समितीवर आक्षेप
    हक्कभंग समितीबाबत विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र

    14:47 (IST)

    धान्य घोटाळा काढल्याबद्दल 'न्यूज18 लोकमत'चे आभार
    प्रकरणाच्या चौकशीसाठी लक्षवेधी मांडणार - पटोले
    चौकशी करून सरकारनं कारवाई करावी - नाना पटोले

    14:27 (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस
    जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत संपावर ठाम
    मुख्य सचिवांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
    मुख्यमंत्र्यांसोबत विधान भवनात महत्त्वाची बैठक
    जुन्या पेन्शनवर बैठकीत तोडगा निघणार का?
    '28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामील होणार'
    राजपत्रित अधिकाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा

    14:3 (IST)

    'राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय'
    संपकऱ्यांनी संप मागे घ्यावा - सुधीर मुनगंटीवार

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स