LIVE Updates : मुंबई नाशिक महामार्ग आसनगाव ब्रिजवर ट्रेलरने टू व्हिलर चालकाला चिरडलं

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 19, 2023, 17:58 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 13 DAYS AGO

    हाइलाइट्स

    22:58 (IST)

    साताऱ्यातील पाटण तालुक्यात गोळीबार. गोळीबारात दोनजण जागीच ठार, एकजण गंभीर जखमी. हल्लेखोर मदन कदम याने गोळीबार केला. गुरेघर धरण परिसरात ही घटना घडली आहे. मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे शहरातील माजी नगरसेवक म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. पवनचक्की मधील पैशांच्या हिशोबावरुन वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात घटना घडली. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण

    22:7 (IST)

    नाशिकच्या शिवाजी नगर परिसरात भरदिवसा गोळीबार. टोळीयुद्धतून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
    गोळीबारात एक युवक जखमी. कोयते बंदुका घेऊन हल्ला. सिनेस्टाईल टोळीयुद्धचा CCTV फुटेज समोर. पोलिसांकडून हललेखिरांचा शोध सुरू

    20:3 (IST)

    ठाकरेंची सभा झालेल्या मैदानातच शिंदेंची सभा
    गोळीबार मैदानातील सभेला मोठी गर्दी
    रामदास कदम कोकणचा ढाण्या वाघ - शिंदे
    हे भगवं वादळ लोकांना दाखवा - एकनाथ शिंदे
    'ठाकरेंच्या सभेसोबत तुलना करायला आलो नाही'
    कोकणात भगवं वादळ आलं आहे - एकनाथ शिंदे
    कोकणच्या भूमीला वंदन करतो, नमन करतो - शिंदे
    'त्या' सभेची तुलना करायला आलेलो नाही - शिंदे
    याच मैदानात फुटका, आपटीबार येऊन गेला - शिंदे
    तेच टोमणे, तेच आरोप, रडगाणं सुरूच - शिंदे
    ठाकरेंकडे फक्त खोके आणि गद्दार हेच शब्द - शिंदे
    कोकणी माणसानं बाळासाहेबांवर प्रेम केलंय - शिंदे
    'आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, सभेनं दिलंय'
    ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला - शिंदे
    कोकणासोबत माझं जिव्हाळ्याचं नातं - एकनाथ शिंदे
    'कोकणातील शिलेदार या लढ्यात माझ्यासोबत'
    सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं - एकनाथ शिंदे
    कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत पक्ष गहाण ठेवला - शिंदे
    सत्तेसाठी भूमिका बदलली, तडजोड केली - शिंदे
    पक्ष सोडवण्याचं काम आम्ही केलं - एकनाथ शिंदे
    बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यासोबतच - शिंदे
    'शिवसेनेला पुढे न्यायचं आहे, मोठी करायची आहे'
    बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत - शिंदे
    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं - शिंदे
    गद्दारी 2019 साली झाली - एकनाथ शिंदे
    शिवसेनेला पुन्हा डाग लागू द्यायचा नाही - शिंदे
    बाळासाहेब तुमचे वडील, आमचे दैवत होते - शिंदे
    खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे
    आम्ही राज्याच्या हिताची भूमिका घेतली - शिंदे
    आम्ही शिवसेना वाचवण्याचं काम केलं - एकनाथ शिंदे
    सावरकरांचा अवमान सहन करू शकत नाही - शिंदे
    एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवरही जोरदार हल्लाबोल
    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर शिंदेंची टीका
    'तुमची संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच संपत्ती'

    17:51 (IST)

    मुंबई नाशिक महामार्ग आसनगाव ब्रिजवर ट्रेलरने टू व्हिलर चालकाला चिरडले. मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव येथील ब्रिजवर टू व्हीलर आणि ट्रेलर मध्ये अपघात. अपघातामध्ये टू व्हीलर चालक जागीच ठार. मुंबईवरून नाशिकच्या दिशेने टू व्हीलर चालक येत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने टू व्हीलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष (सनी) सुधाकर गोसावी असे नाव आहे.

    17:39 (IST)

    जुन्नर: माळशेज घाट परिसरात खुबी येथे ट्रेकिंग साठी आलेले 15 जण दरीत अडकले. नाशिक येथील सर्वजण असल्याची माहिती. रेस्क्यू टीम कडून रोप सोडून ट्रेकरला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू.

    17:12 (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान केले. अभविप विरुद्ध महा विकास आघाडी मध्ये सिनेट मध्ये थेट मुकाबला होणार आहे.

    14:57 (IST)

    देशात असे अनेक लोक आहेत - संजय राऊत
    त्यांच्या घरी पोलिसांनी जायला हवं - संजय राऊत
    ईडी, सीबीआयनंही जायला हवं - संजय राऊत
    पण या सर्वांना संरक्षण आहे, राऊतांचा निशाणा
    'विरोधकांच्या घरी पोलीस घुसून दहशत होतेय'
    'काहीही झालं तरी तुटायचं नाही असं ठरवलंय'
    त्यामुळे काही फरक पडत नाही - संजय राऊत
    कोर्टाला धमक्या देऊन दबावाचं काम सुरू - राऊत
    'महाराष्ट्रात असे अनेक बाबा लोक येत असतात'
    त्यांचा काही राजकारणी वापर करतात - संजय राऊत
    महाराष्ट्रात हे जास्त काळ नाही चालणार - राऊत
    ज्यांना अंधभक्ताप्रमाणे जायचं तो जाईल - राऊत
    मी कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही - संजय राऊत
    काही लोक राजनीतीदेखील करतात - संजय राऊत

    12:8 (IST)

    औरंगाबाद नामांतराच्याविरोधात न्यायालयात याचिका

     येत्या 24 तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

    छत्रपती संभाजीनगर नामकरणला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल 

    येत्या 24 तारखेला न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

    6:37 (IST)


    उपमुख्यमंत्री फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर 
    रुईछत्तीसीत देवेंद्र फडणवीसांचा नागरी सत्कार

    6:33 (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस 
    जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत संपावर ठाम
    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका
    संपामुळे आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर,रुग्णांचे हाल

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स