LIVE Updates : मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा मृत्यू

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 28, 2023, 15:39 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  16:59 (IST)

  भुकंपाच्या धक्क्याने जपान हादरलं, 6.1 तीव्रतेची नोंद

  15:35 (IST)

  मंत्रालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  13:35 (IST)

  श्रीरामनवमीनिमित्त साईनगरी शिर्डीत विविध भागातून पालख्या येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, रामनवमीच्या मुख्य दिवशी ३० मार्च रोजी रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

  13:24 (IST)

  पिंपरी - भोसरीतील वखार मंडळाजवळची घटना
  मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग
  अग्निशमनकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न

  12:20 (IST)

  वीज गेल्याच्या रागातून नागपूरमध्ये एका व्यक्तीने थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी फोन करून घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.

  11:34 (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलीय.

  11:10 (IST)

  मुंबई मनपा 'कॅग' अहवालावरून भाजप आक्रमक
  'मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची SIT चौकशी करा'
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचं निवेदन

  11:8 (IST)

  आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार 
  सुषमा अंधारेंनी महिला आयोगाकडे केली तक्रार
  शिरसाटांनी अपशब्द वापरल्याचा अंधारेंचा आरोप
  सुषमा अंधारेंनी पोलिसातही दिली तक्रार

  11:4 (IST)

  समृद्धी महामार्गाला नांदेड जोडून नागपूर-नांदेड प्रवासाचा वेळ वाचवणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. यामुळे नागपूर ते नांदेड अंतर तीन तासात गाठता येणार आहे.

  10:8 (IST)

  सावरकर आणि भाजपचा संबंध नाही - राऊत
  आम्ही सावरकर जगलोय, जगतोय - राऊत
  राहुल गांधींशी आमचा संपर्क सुरू - राऊत
  कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांशी चर्चा - संजय राऊत
  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल - संजय राऊत

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स