LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, मंत्र्यांसह ‘या’ दिवशी अयोध्या दौऱ्यावर

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 25, 2023, 19:57 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:4 (IST)

    बोरिवलीतील गोराई 3 येथे गोराई लक्ष्मी या इमारती मध्ये सोळाव्या मजल्यावरील एका फ्लॅटला भीषण आग लागली आहे. आग लागण्याचे कारण मंदिरात दिवा दिवा लावण्यात आला होता. दिवा लावू घराच्या बाहेर गेले होते. दिव्याची वात जास्त मोठी असल्यामुळे चक्क अख्ख घर पेटलं. अग्निशमन दल माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आहे.

    19:55 (IST)

    मंत्री ३ दिवस आधीच जाणार आहेत.सकाळी राम लल्लाचे दर्शन आणि रात्री शरयू नदी महाआरती होणार.

    19:54 (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांचे सहकारी मंत्री, शिवसेना आमदार आणि खासदारांचा अयोध्या दौरा 5 एप्रील 2023 रोजी होणार आहे. अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार. साधू, संत आणि महंतांकडून “शिवधनुष्य” स्विकारणार.

    15:18 (IST)

    राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे - रविशंकर प्रसाद
    'राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान'
    'माफी न मागितल्यानंच राहुल गांधींवर कारवाई'
    खोटं बोलणं ही राहुल गांधींची सवय - रविशंकर
    'परदेशात जाऊन राहुल गांधींची भारतावर टीका'
    'निवडणुकीत फायद्यासाठी कॉंग्रेसचा कांगावा'

    कॉंग्रेस नेते राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक
    राहुल गांधींविरोधात भाजप देशभर आंदोलन करणार

    12:25 (IST)

    मुंबई मनपातील 'कॅग'चा अहवाल सादर
    फडणवीसांनी 'कॅग'चा अहवाल मांडला
    'निधीचा गैरवापर केल्याचं अहवालात नमूद'
    निधीचा निष्काळजीपणे वापर - फडणवीस
    'मनपा आणि कंत्राटदारांमध्ये करारच नाहीत'
    मान्यता नसताना कामं दिली - फडणवीस

    12:0 (IST)

    राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन
    'राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागावी'
    'राहुल गांधींना राज्यात फिरू देणार नाही'
    'ओबीसींचा अपमान सहन करणार नाही'
    भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आंदोलनात

    11:28 (IST)

    लोकपाल विधेयक संसदीय समितीकडे पाठवणार
    पावसाळी अधिवेशनापूर्वी विधेयकावर निर्णय घेणार
    सीएम, डीसीएम, गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

    10:48 (IST)

    राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
    विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
    कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचं मूक आंदोलन

    10:41 (IST)

    ठाकरेंच्या सभेची सर्वांना उत्सुकता - राऊत
    महाराष्ट्रातून देशात संदेश जाईल - राऊत
    लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न - राऊत
    विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न - राऊत
    लोकांच्या मनात चीड - संजय राऊत
    जनतेची चीड सभेतून दिसेल - राऊत
    'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही'
    सावरकरांचा आम्हाला अभिमान - राऊत
    राजीनामा देऊन निवडणुका घ्या - राऊत

    6:43 (IST)

    राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
    विविध प्रश्नांवरून सभागृहात वादाची शक्यता
    विरोधकांच्या प्रश्नांना फडणवीस देणार उत्तर

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स