LIVE Updates : राज्यात राम नवमीचा जल्लोष; ठिकठिकाणी मिरवणुकांचे आयोजन

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 30, 2023, 18:45 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    21:14 (IST)

    संपुर्ण देशभर राम नवमीची धूम पाहायला मिळतं असून भंडारा शहरात देखील अनोख्या पद्धतीने राम नवमी साजरी करण्यात आली आहे. राम,लक्ष्मण, सिता, हनुमान, शिवाजी महाराज, शंकर भगवान यांच्या रूपात मुलांना सजवून झाक्या तयार करण्यात आले. तसेच दांडिया देखील सादर करण्यात आला हि भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे..

    18:45 (IST)

    रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आज रामनवमी मोठ्या जल्लोशात साजरी करण्यात आली. भगवे झेंडे हातात घेत भगवे कपडे परीधान करीत हजारोच्या संख्येत माणगावकर या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले. श्रीरामाची भव्य प्रतीमा आणि राम, सीता, लक्ष्मण यांची वेशभुषा केलेले मुलांसह ढोल ताशा पथक देखील वेळी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.  माणगाव तहसिल कार्यालयातुन प्रारंभ झालेल्या या रॅलीची सांगता खांदाड येथे राम मंदीरामध्ये महाआरतीने झाली.

    18:44 (IST)

    श्रीराम नवमीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या थाटात साजरा होतो. यातच अनेक श्रीराम भक्त वेगवेगळ्या पद्धतीने श्रीराम नवमी साजरी करताना दिसून येतात. बीड शहरामध्ये देखील श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पाहायला मिळतोय. सकाळी दहाच्या सुमारास बीड शहरातील बार्शी नाका या परिसरातून भव्य दिव्य असे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याच रॅलीमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे बाहुबली यांचा देखावा पाहण्यासाठी बीड करांनी मोठी गर्दी केली होती.

    18:44 (IST)

    श्रीराम नवमीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या थाटात साजरा होतो. यातच अनेक श्रीराम भक्त वेगवेगळ्या पद्धतीने श्रीराम नवमी साजरी करताना दिसून येतात. बीड शहरामध्ये देखील श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पाहायला मिळतोय. सकाळी दहाच्या सुमारास बीड शहरातील बार्शी नाका या परिसरातून भव्य दिव्य असे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याच रॅलीमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे बाहुबली यांचा देखावा पाहण्यासाठी बीड करांनी मोठी गर्दी केली होती.

    18:3 (IST)

    भाजप आमदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंसज शिवेंद्रराजे भोसले यांनी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. या समाधी स्थळाचा विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच महाराणी येसूबाई यांची ही समाधी साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सापडली होती. ही समाधी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. पण आता याकडे गावातील ग्रामस्थांनी त्याच बरोबर इतिहास प्रेमींनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आज शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस असल्याने महाराणी येसूबाई यांच्या समाधीला अभिवादन करून कार्यक्रमांची सुरुवात केली आहे. 

    12:24 (IST)

    संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी - फडणवीस
    संभाजीनगरमधील प्रकार दुर्दैवी - फडणवीस
    नेत्यांनी चुकीची विधानं करू नयेत - गृहमंत्री
    संभाजीनगरमध्ये सध्या शांतता - फडणवीस

    12:8 (IST)

    मुख्यमंत्री शिंदे 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर 
    शिंदेंसह मंत्री, आमदार, खासदारही अयोध्येला
    शिंदे अयोध्येत प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार 
    साधू, संत-महंतांकडून 'शिवधनुष्य' स्वीकारणार
    शिंदेंच्या हस्ते शरयू नदी महाआरती होणार

    11:32 (IST)

    नांदेड - टेम्पो आणि रिक्षाची धडक
    भीषण अपघातात 4 ठार, 6 जण जखमी
    मुदखेड-मुगट मार्गावरील दुर्घटना

    10:40 (IST)

    कांदा उत्पादकांना भरीव मदत द्या - अजित पवार
    'काही शेतकऱ्यांकडे अजून मदत पोहोचली नाही'
    फळबागांचं मोठं नुकसान झालंय - अजित पवार
    नुकसानग्रस्तांना मदत कधी देणार? - अजितदादा
    'सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवावी'
    संपामुळे पंचनाम्यांना वेळ लागला - अजित पवार
    कांद्याची बंद केंद्र सुरू करावीत - अजित पवार
    'सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला खडसावलं'
    सरकारला आत्मचिंतनाची गरज - अजित पवार
    खरं बोलल्यास सत्ताधाऱ्यांना राग येतो - अजितदादा

    9:57 (IST)

    'मुंबई-गोवा महामार्गागाची अवस्था पाहून दु:खी'
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत
    'महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्यावर भर देणार'
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं ठोस आश्वासन 
    'कोकणात भूसंपादनात अनेक अडचणी येतात' 
    भूसंपादनाअभावी प्रकल्प रखडले - गडकरी
    ब्लॅक स्पॉटबाबत समिती नेमलीय - गडकरी
    'बांधकाम मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी समितीत'

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स