LIVE Updates : तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रणव वूड्स कंपनीला मोठी आग, अग्निशमन घटनास्थळी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 29, 2023, 23:00 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    22:58 (IST)

    तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रणव वूड्स कंपनीला मोठी आग लागली. आगीचे कारण अजून समोर नाही. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आजू बाजूला अनेक कंपन्या असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

    22:18 (IST)

    नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी बसने शीळ दिवा मार्गावर एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला बिलाल हॉस्पिटल कौसा या ठिकाणी उपचारखातर भरती करण्यात आले असून पुढील तपास डायघर पोलीस करत आहे. दरम्यान शीळ दिवा हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावर बस चालक भरधाव वेगाने बस चालवित असल्याचा आरोप होत असून याबाबत बस चकलाविरोधत अनेक तक्रारी नवी मुंबई पालिका आणि परिवहन विभागाकडे गेल्या आहेत.

    22:11 (IST)

     नाशिकच्या सायखेडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा चिमूकला ठार. द्राक्ष बागाचे काम करण्यासाठी आलेल्या मजुराच्या मुलावर काळाचा घाला. दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या हातातून मुलाला ओढून नेल्याची घटना. आई देखत बिबट्याने मुलाला ऊसाच्या शेतात ओढून नेत केलं ठार. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हळहळ.

    20:9 (IST)

    ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन
    नाबा दास यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार
    नाबा दास यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

    19:38 (IST)

    भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 महिला वर्ल्ड कप
    भारतीय महिला संघानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला
    भारतीय महिला संघाचा 7 विकेट्स राखून विजय
    भारतानं फायनलमध्ये इंग्लंडला चारली धूळ
    भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास

    18:36 (IST)

    19 वर्षांखालील वर्ल्ड कपची मेगाफायनल
    इंग्लंडचा महिला संघ 68 धावांवर गारद
    भारतीय महिला संघासमोर 69 धावांचं लक्ष्य
    भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

    18:7 (IST)

    नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर शहरासह तालुक्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासुन आज जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण होत मात्र दुपारनंतर नवापुर शहरात पाऊस पडायला सुरवात झाली. आज नवापुरचा आठवडे बाजार असल्याने या अचानक आलेल्या पावसाने अनेंकाची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे तालुक्यातील विसरवाडी आणि अन्यभागातही अवकाळी सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसाने शेतकऱयाचे मोठे नुकसानीची अंदाज वर्तवल्या जात आहे.

    18:7 (IST)

    बुलढाणा रोडवरील नुकत्याच सुरू झालेल्या बायपास वर कार आणि ट्रकचा अपघात झाला असून ट्रक व कारच्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा रोडवरील नवीन बायपासवर मलकापूरकडे जाणारा ट्रक आणि कारला अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी नांदुरा पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना ताबडतोब  रुग्णांना सुश्रुषा रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    18:5 (IST)

    नोवाक जोकोविचचा शानदार विजय
    जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता
    जोकोविचच्या खात्यात आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम

    15:39 (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर
    एकनाथ शिंदे संत समागम सोहळ्याला उपस्थित

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स