LIVE Updates : कल्याणमध्ये चालत्या बसला भीषण आग, मोठा गदारोळ, पाहा VIDEO

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 28, 2022, 23:54 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:52 (IST)

  - कल्याण-नवी मुंबईच्या बसला लागली आग

  - कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात मेट्रो मॉलजवळ बसला लागली आग

  - शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

  - कल्याणहून नवी मुंबईला चालली होती बस

  - प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

  23:39 (IST)

  पंढरपूर :

  - पांडुरंगाच्या मंदिरात भजनाला बंदी करणारे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना मंदिराच्या कारभारातून हटवले 

  - नामजप सोहळा बंद करण्याचे आदेश दिल्याचा ठपका कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यावर होता.

  - वारकरी पाईक संघाने निर्णय मागे घेतल्यानंतर कार्यकारी अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची केली होती मागणी.

  - भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदमुक्त करण्याची केली होती  मागणी

  - कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदमुक्त करुन पदभार अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला.

  20:14 (IST)

  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

  19:32 (IST)

  लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा
  2020 चा पुरस्कार उषाताई मंगेशकर यांना प्रदान
  2021 चा पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसियांना प्रदान
  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित

  18:57 (IST)

  अंबरनाथ नगरपरिषदेकडे जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक निधी मिळणार, विकासकामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  18:57 (IST)

  कुळगाव-बदलापूरमधील पूररेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, विविध विकासकामं, प्रकल्पांचाही घेतला आढावा

  18:54 (IST)

  - लेफ्टनंट अनिल चौहान भारताचे दुसरे सीडीएस
  - बिपीन रावत यांच्यानंतर अनिल चौहान भारताचे दुसरे सीडीएस
  - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनिल चौहान यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला

  18:53 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांना MMRDA मैदानात दसरा मेळावा घेण्याची अधिकृत परवानगी

  18:52 (IST)

  ले.जनरल अनिल चौहानांची CDS म्हणून नियुक्ती
  चौहानांकडे लष्करी व्यवहार विभागाचं सचिवपदही
  केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाची घोषणा

  18:44 (IST)

  कालचा निकाल आपल्यातला उत्साह वाढवणारा - शिंदे
  या निकालामुळे अनेकांचे ढाबे दणाणलेत - मुख्यमंत्री
  आता दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचाय - शिंदे
  'मेळाव्यासाठी अडीच ते 3 लाख लोक येण्याची शक्यता'
  या गाड्यांसाठी आसपासची 10 मैदानं बुक - एकनाथ शिंदे
  अनेकजण आपल्यासोबत प्रवेशास इच्छुक - एकनाथ शिंदे
  अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्याला होतील - एकनाथ शिंदे
  येणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यवस्था नीट व्हावी - एकनाथ शिंदे
  कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही - एकनाथ शिंदे

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स