LIVE Updates : पंढरपूर येथे पादचारी वृद्ध महिलेचा एसटी खाली चिरडून मृत्यू

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 25, 2023, 20:17 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 11 DAYS AGO

  हाइलाइट्स

  22:7 (IST)

  केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा
  गडचिरोलीतील परशुराम खुणेंचा 'पद्मश्री'नं सन्मान
  प्रभाकर मांडे,भिकू इदाते,रविना टंडन यांना 'पद्मश्री'
  तबलावादक झाकीर हुसैन यांना 'पद्मविभूषण'
  सुमन कल्याणपूरकरांना 'पद्मभूषण' जाहीर
  कुमार मंगलम बिर्लांना 'पद्मभूषण' पुरस्कार
  सुधा मूर्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
  दीपक धार यांना पद्मभूषण पुरस्कार
  राकेश झुनझुनवालांना मरणोत्तर पद्मश्री
  मुलायमसिंह यादवांना मरणोत्तर पद्मविभूषण

  21:28 (IST)

  वैजापूर जवळील घायगाव पाटीजवळ भीषण अपघात. आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरची धडक. अपघातात ट्रॅक्टरचा पूर्ण चुराडा तर आयशर ट्रक भर रस्त्यात उलटल्याने वाहतूक विस्कळित. आयशर ट्रक औरंगाबादहून मुंबईकडे जात होता तर ट्रॅक्टर वैजापूर कडून येत होता. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, तर ट्रकच्या चालकाला जबर मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

  20:59 (IST)

  गडचिरोलीतील परशुराम खुणेंचा पद्म पुरस्कारानं गौरव
  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर

  20:53 (IST)

  पुण्यातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न, धायरीत भाजी मार्केटमध्ये कोयता नाचवणाऱ्या 3 गुंडांची सिंहगड पोलिसांनी भर बाजारातून काढली धिंड

  20:49 (IST)

  शिवाजीनगर स्टेशन येथून पुणे-लोणावळा लोकलसेवा
  खासदार बापटांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाची मान्यता
  नांदेड-हिंगोली-मुंबई ट्रेन सुरू करण्यासही हिरवा कंदील

  20:17 (IST)

  सोलापूर येथील नऊ जणांचा जथ्था तिरुमला येथे दर्शन घेऊन कानिपकमकडे जात असताना अपघात झाला. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. तवेरा कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. ऋषिकेश, मयूर, अजय, रोहन, राहुल, श्रीनार्लेकर, अंतरवू, सुनील आणि अंबादास अशी सर्वांची नावे आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

  20:16 (IST)

  पंढरपूर येथील सर्वात गजबजलेल्या सरगम चौकात बुधवारी दुपारी चार वाजता एसटी बसने पादचारी वृद्ध महिलेस धक्का दिल्याने ती पडून पुढील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या चौकात आजपर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. ही महिला सरगम चौकातून भोसले चौकाकडे आपल्या घरी चालत जात होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी आले. या महिलेचे नाव जयाबाई थिटे असे असून ही महिला अरिहंत पब्लिक स्कूल सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती.

  19:10 (IST)

  अविनाश भोसलेंना कोर्टाचा दणका, तीन दिवसांत जे.जे. रुग्णालयामध्ये सर्व तपासणी चाचणी पूर्ण करून तुरुंगात पाठवावं, सीबीआय कोर्टाचा आदेश 

  19:2 (IST)

  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
  'उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत महाराजस्व अभियान'
  जिल्हाधिकारी कार्यालय ते गावपातळीवर अभियान
  शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार निकाली काढणार
  गाव दप्तर अद्ययावत करण्याचे शासनाचे आदेश
  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद रस्ते मोकळे होणार
  गाव तिथं दफनभूमी, गाव तिथं स्मशानभूमी अभियान

  18:10 (IST)

  'माझी युती ठाकरेंच्या पक्षाशी, मविआसोबत नाही'
  'वंचित बहुजन'चे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स