LIVE Updates : उद्धव ठाकरेंची आज 5 वाजता पत्रकार परिषद

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 24, 2022, 14:07 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 14 DAYS AGO

  हाइलाइट्स

  20:36 (IST)

  पाणी समस्येवरून जतमधील ग्रामस्थ आक्रमक
  'सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी'
  'पाणी द्या, नाहीतर एनओसीची वाट बघणार नाही'
  आम्ही थेट कर्नाटकात जाऊ - सुनील पोतदार
  जत तालुका पाणी कृती समिती अध्यक्षांचा इशारा

  20:0 (IST)
  राज्यातील उमेदवारांना न्याय देण्यासाठी 'महानिर्मिती'च्या पदभरती प्रक्रियेत सर्वांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी
   
  19:46 (IST)

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उद्याचं आंदोलन स्थगित, 29 तारखेला मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं - राजू शेट्टी

  19:42 (IST)

  'सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहावा'
  केंद्र सरकारशी चर्चा करणार - मुख्यमंत्री शिंदे
  'चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसमोर विविध समस्या'
  'यासंदर्भात धोरणात बदलासाठी चर्चा करणार'
  मुख्यमंत्र्यांचं शेतकरी शिष्टमंडळाला आश्वासन

  19:31 (IST)

  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाबाच्या भटिंडा तुरुंगातून आणलं, तपास यंत्रणा 10 दिवसांच्या रिमांडमध्ये लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करणार

  19:21 (IST)

  शेतकरी मागण्यांसाठी किसान सभेचं राज्यभर धरणं आंदोलन, 
  ओला दुष्काळ आणि इतर मागण्यांसाठी काढणार राज्यभर मोर्चे

  19:5 (IST)

  औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार समोर, शेजारच्याचा व्यवसाय बंद पडावा म्हणून जादूटोणा, घटना CCTV मध्ये कैद, जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  18:46 (IST)

  कल्याण - अखेर 9 तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्या जेरबंद, संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली टीमची कामगिरी, रेस्क्यू ऑपरेशन करीत असताना दोनजण जखमी, चिंचपाड्यातील एका इमारतीत शिरला होता बिबट्या

  18:35 (IST)

  बारामतीपाठोपाठ शिरूर मतदारसंघावर भाजपचा डोळा
  आतापासूनच शिरूर मतदारसंघात भाजपचे दौरे सुरू 
  'उमेदवार कोणीही असो, शिरूर लढणार तर भाजपच'
  भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेलांचं वक्तव्य
  'आढळरावच काय, कोल्हेही भाजपात आल्यास स्वागतच'

  18:5 (IST)

  शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही - शिंदे
  'विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं राजकारण'
  आत्मविश्वास होता म्हणून आमचं सरकार आलं - शिंदे
  बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार - मुख्यमंत्री शिंदे
  '30 जूनलाच ज्यांना हात दाखवायचा तो दाखवला'
  महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाणार नाही - शिंदे

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स