विक्रोळीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा नूतनीकरण कधी होणार अशा आशयाचे फ्लेक्स दाखवले. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली. भाषणादरम्यान या फ्लेक्स कडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांकडून मुख्यमंत्री आमच्याकडे लक्ष द्या अशा घोषणाही देण्यात आल्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी या नागरिकांची दखल घेत लवकरात लवकर या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचं आश्वासन दिलं. काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोलिसांनी या आंदोलकांना फ्लेक्स ताब्यात घेतले आणि या आंदोलकांना विक्रोळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.