जोतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली. रविवार माघ पौर्णिमेला जोतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास काही बैल मंदिर प्रदक्षिणेसाठी घेऊन आले असता देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यात बैल मंदिरात नेण्यावरुन वाद झाला. गर्दीच्या वेळी दुर्घटना होण्याच्या शक्यतेने देवस्थान समितीने बैलाला प्रवेश नाकारला त्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन भाविकाना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. भाविकांना झालेल्या माराहाणीबद्दल पुजारी आणि भाविकांकातुन तीव्र संताप व्यक होत आहे.
अहमदनगरच्या देवळाली प्रवरा येथे भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दहा फूट खोदकाम झालेल्या खड्यामध्ये 21 वर्षीय परप्रांतीय कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला असल्याचा आरोप करत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स