LIVE Updates : कसारा-मेल एक्सप्रेस इंजिन रुळांवरून खाली उतरले, वाहतूक विस्कळीत

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 06, 2022, 21:12 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:25 (IST)

  मोरोक्कोकडून बलाढ्य स्पेनचा पराभव
  स्पेनचं फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात

  21:27 (IST)

  'फुरसुंगी-उरुळी देवाची गावासाठी नवीन नगरपालिका'
  नव्या नगरपालिकेचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय
  'नवीन नगरपालिका नागरी विकासात सर्वोत्कृष्ट ठरेल'

  20:32 (IST)

  भूमिगत पुणे मेट्रोची चाचणी देखील यशस्वी
  सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत धावली मेट्रो

  20:28 (IST)

  'दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा'
  दोन्ही राज्यांत शांतता राहिली पाहिजे - उदय सामंत
  दोन्ही राज्यांतील जनतेला त्रास होऊ नये - उदय सामंत
  लवकरच दोन्ही मुख्यमंत्री भेटतील - उदय सामंत
  'हा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेंनी पुढाकार घेतलाय'
  सर्वांनी शांतता राखावी, उदय सामंतांचं आवाहन

  19:52 (IST)

  रत्नागिरी - दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण
  किरीट सोमय्यांकडून हायकोर्टात अवमान याचिका
  'जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप'
  मुख्य याचिकेसह अवमान याचिकेवर सुनावणीची शक्यता
  9 जाने.पर्यंत कारवाई यथास्थिती ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश

  19:29 (IST)

  उद्यापासून सुरू होतंय संसदेचं हिवाळी अधिवेशन
  दोन्ही राज्यांतील सीमावादाचा मुद्दा गाजणार
  शिंदे पक्षातील खासदार अमित शाहांची भेट घेणार

  19:0 (IST)

  शिवरायांबाबत सर्वांच्या मनात आदर - देवेंद्र फडणवीस
  मविआची राज्यपालांवर वेगळीच नाराजी - फडणवीस

  18:58 (IST)

  स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो - फडणवीस
  'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली'
  दोषींवर कारवाईबाबत बोम्मईंचं आश्वासन - फडणवीस
  महाराष्ट्र नेहमीच कायद्याचं राज्य राहिलंय - फडणवीस
  कुणीही कायदा हातात घेऊ नये - देवेंद्र फडणवीस
  कुणीही चिथावणीखोर वक्तव्यं करू नये - फडणवीस
  हा विषय अमित शाहांच्या कानावर घालणार - फडणवीस
  'शरद पवारांवर कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही'
  केंद्र - कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल - फडणवीस

  18:42 (IST)

  बेळगावमधील घटनेवरून आशिष शेलार आक्रमक
  'कर्नाटकच्या हुल्लडबाजीला महाराष्ट्र घाबरणार नाही'
  'हल्लेखोरांना अटक करणं ही कर्नाटकची जबाबदारी'
  मराठी लोकांना सुरक्षा द्यायची जबाबदारी त्यांची - शेलार
  'महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकातील गाड्यांवरही काचा'
  कानडी संघटनेनं लक्षात ठेवावं, आशिष शेलारांचा इशारा

  18:27 (IST)

  पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन
  कर्नाटक सरकारच्या गाड्यांची सोडली हवा
  कर्नाटकात केलेल्या दादागिरीला 'स्वराज्य'चं उत्तर

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स