LIVE Updates : मुंबईमध्ये BMC इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 27 टक्के वाढली

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 05, 2022, 16:11 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:7 (IST)
  अफझल खानाच्या वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्याचा प्रयत्न, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य
   
  21:6 (IST)

  एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला विक्रमी जागा मिळण्याची शक्यता, काँग्रेसची घसरगुंडी तर आप फक्त खातं खोलणार, हिमाचलमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पण काँग्रेस टक्कर देणार - एक्झिट पोल

  19:51 (IST)

  महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपली
  राज्यपालांच्या वक्तव्यावर बैठकीत चर्चा
  मविआ सरकार गद्दारी करून पाडलं - ठाकरे
  राज्यात फुटीरतेचं बीज पेरलं जातय - उद्धव ठाकरे
  हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू - ठाकरे
  17 डिसेंबरला मुंबई मविआचा विराट मोर्चा - ठाकरे
  'जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत महामोर्चा'
  17 डिसेंबरला महाराष्ट्राची एकजूट दाखवू - ठाकरे
  महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणं सुरू - अजित पवार
  शिवरायांचा सातत्यानं अपमान होतोय - अजित पवार
  मोर्चातून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध - पवार
  'राज्यपालांना त्याआधी हटवलं तरी मोर्चा निघणारच'
  'सांगली, देगलूरची गावं कर्नाटकात जायचं बोलतात'
  काही गावांची गुजरातमध्ये जाण्याची मागणी - पवार
  हे सरकारचं अपयश आणि दुर्लक्ष - अजित पवार
  'शिवरायांचा अपमान जनतेच्या भावनेला ठेच'
  'महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यात पळवले जातायत'
  महाराष्ट्रात जे सुरू ते जनतेला न पटणारं - थोरात
  महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही - थोरात

  18:15 (IST)

  अॅड.प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाण्यास तयार?
  वंचितला सोबत घ्यायचं की नाही, आज निर्णय होणार?
  उद्धव ठाकरेंसोबत आज झाली होती महत्त्वाची बैठक
  आंबेडकरांकडून युती करण्यास सकारात्मकता - सूत्र
  काँग्रेस-NCP नेत्यांशी शिवसेना नेते बोलणार - सूत्र

  17:31 (IST)

  वैभव नाईकांची एसीबीकडून कसून चौकशी
  वैभव नाईकांच्या मालमत्तेची केली चौकशी
  'व्यवसाय करत असल्याची माहिती सादर केली'
  'कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाणार'
  9 तारखेला एसीबी कार्यालयात येणार - वैभव नाईक

  17:13 (IST)

  कोर्टाचा आम्हाला आदर - रवी राणा
  '17 डिसेंबरला आम्ही दोघेही हजर राहणार'

  17:10 (IST)

  आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर
  14 डिसेंबरला दोघांनीही हजर व्हावं - कोर्ट
  17 डिसेंबरला हजर राहण्याची परवानगी द्या - राणा
  बेलेबल वॉरंट रद्द करण्याची मागणी कोर्टाकडून अमान्य
  रवी आणि नवनीत राणा 17 डिसेंबरला होणार हजर

  17:0 (IST)

  मुख्यमंत्री शिंदेंची ज्योतिरादित्य सिंधियांसोबत चर्चा
  'महाराष्ट्रात तालुका स्तरांवर हेलिपॅड तयार करणार'
  'राज्यातील बंद असलेली विमानतळं सुरू करणार'
  'वेळेत मदतीसाठी हेलिकॉप्टरचं जाळं विस्तारणार'
  राज्य सरकारकडून एक आराखडा केंद्राकडे सादर

  16:30 (IST)

  आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान
  हिंदू महासंघाकडून मुंबई हायकोर्टात याचिका

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स