Live Update : 'माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग', शरद पवार नेमकं काय म्हणाले?

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 02, 2022, 18:55 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:22 (IST)

  नाशिकच्या सप्तशृंगी गडावर हजारो भाविक अडकले
  एकतर्फी वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णय
  वर अडकलेल्या भाविकांना खाली आणण्याचा निर्णय
  नव्यानं येणाऱ्या भाविकांना नांदुरीतच रोखून ठेवलं
  सप्तशृंगी गडावर दिवसभरात लाखो भाविकांची हजेरी

  19:32 (IST)

  साताऱ्याच्या वाई तालुक्यातील शिरगाव इथं 2 लहान मुलांचा शॉक लागून मृत्यू

  18:53 (IST)

  पुणे : 

  रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

  शरद रयत चषक अंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार पारितोषिक वितरण 

  माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,  शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, पश्चिम विभागाचे चेअरमन ऍड. राम कांडगे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आदी उपस्थित

  शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

  - माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे जिथं लोक माझ्यावर बोलतात आणि मला ऐकावं लागतय

  - सहसा मी हे टाळतो

  - हा सगळा कार्यक्रम माझ्याभोवती केंद्रीत आहे हे माझ्या लक्षात आलं

  17:58 (IST)

  मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होणार - शिंदे
  मुंबई-पुणे नवीन टनेल लवकरच - मुख्यमंत्री

  17:55 (IST)

  बीकेसीवर होणार शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मैदानाची पाहणी
  'लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतोय'
  'प्रशासनानं दोघांनाही शिवाजी पार्क प्रथम नाकारलं'
  त्यानंतर ठाकरे समर्थकांना कोर्टाची परवानगी - शिंदे
  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद‌्भवणार नाही - शिंदे
  'सुप्रीम कोर्टात न जाता मेळावा साजरा करणार'
  बीकेसीवरील दसरा मेळावा उत्साहात होणार - शिंदे

  17:49 (IST)

  Video : Bigg Boss मराठी पर्व 4; यंदा बिग बॉसच्या घरात केलाय मोठा बदल, तुम्ही पाहिला का?

  17:43 (IST)

  कोल्हापूर :

  - हैद्राबादकडे जाणारी फ्लाईट तब्बल दीड दिवस लेट

  - प्रवाशांचा कोल्हापूर विमानतळावर संताप

  - कोल्हापूरला आलेले प्रवाशी विमानतळावर अडकून

  - प्रवाशांना नाहक खर्च

  17:29 (IST)

  गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल

  17:27 (IST)

  हैदराबादला जाणारं विमान दीड दिवस उशिरानं
  कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांचा संताप
  प्रवासी विमानतळावर अडकून, नाहक खर्च

  17:7 (IST)

  बीकेसीवर होणार शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मैदानाची पाहणी

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स