LIVE Updates : नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 01, 2022, 17:56 IST |  Aurangabad Cantonment, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  17:35 (IST)

  कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं
  सांगलीतील जतच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी
  कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी तलावात पाणी
  तुबची बबलेश्वर योजनेतून कर्नाटकनं सोडलं पाणी
  तिकोंडीतील साठवण तलाव एक दिवसात ओव्हरफ्लो

  सांगली - जतच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं, कर्नाटक सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून तिकोंडी तलावात सोडलं पाणी, कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामुळे तिकोंडीतील साठवण तलाव एक दिवसात ओव्हरफ्लो 

  17:5 (IST)

  बेळगाव - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राडा
  कन्नड रक्षण वेदिकेचा ध्वज फडकावल्यानं राडा
  मराठी आणि कन्नड भाषिक विद्यार्थ्यांमध्ये राडा
  मराठी विद्यार्थ्यांकडून कन्नड भाषिकांना चोप
  वातावरण तापलं, कन्नड रक्षण वेदिका रस्त्यावर
  टायर जाळून कन्नड रक्षण वेदिकेची निदर्शनं 

  17:5 (IST)

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोम्मई पुन्हा बरळले
  आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर - बोम्मई
  'महाराष्ट्राचा अर्ज कोर्टात ग्राह्य धरला जाऊ शकत नाही'
  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
  सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया 

  17:4 (IST)

  आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
  नितेश राणे - राज ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा
  राज ठाकरेंची सदिच्छा भेट - आमदार नितेश राणे 

  17:4 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
  संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा - राज ठाकरे
  जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहावा - राज ठाकरे
  पवारांनी कधीही शिवरायांचं नाव घेतलं नाही - राज
  'राष्ट्रवादीकडून जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात'
  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर घणाघात 

  17:4 (IST)

  उद्योगमंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
  'टीका करण्यासाठी मुद्दा पाहिजे म्हणून ते बोलतात'
  सत्ता गेल्यामुळे राऊतांची चिडचिड - उदय सामंत
  संजय राऊतांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही - सामंत
  राऊतांकडे मनोरंजन म्हणून बघतो - उदय सामंत
  'राष्ट्रवादी सत्तेतून गेल्याचं राऊतांना अधिक दुःख'
  उद्योगमंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

  17:3 (IST)

  छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान - राऊत
  'अपमान कोण जास्त करतंय याची सरकारमध्ये स्पर्धा'
  40 आमदार गेले तरी जनता आमच्यासोबत - राऊत
  'शिवसैनिकांच्या भेटीसाठी उत्तर महाराष्ट्राचा दौरा'
  संजय राऊतांचं पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र

  17:2 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 
  ज्यांना कामधंदे नाहीत ते असं बोलतात - मुख्यमंत्री
  आम्ही आमच्या कामांनी विरोधकांना उत्तर देऊ - शिंदे
  सीमावादासंदर्भात कोर्टात आमची बाजू मांडू - मुख्यमंत्री

  17:2 (IST)

  औरंगाबादमधील रिक्षाचालकांचा संप मागे
  परिवहन विभागाकडून काही मागण्या मान्य
  मीटर आधुनिकीकरणासाठी आणखी 30 दिवस
  रिक्षांचं रजिस्ट्रेशन वेगानं करण्याची हमी

  16:59 (IST)

  मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
  पक्ष कार्यालय उद्‌घाटनाला पटोलेंना निमंत्रण नाही
  अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली झालं उद्‌घाटन
  प्रभारी एच.के. पाटील होते ऑनलाईन उपस्थित
  पटोलेंच्या पत्रकार परिषदेलाही चव्हाणांची दांडी
  अशोक चव्हाण आणि नाना पटोलेंमध्ये वाद?

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स