Live Updates : नितीन गडकरी धमकी प्रकरण, तपासासाठी NIAचे पथक नागपुरात

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 25, 2023, 08:18 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 13 DAYS AGO

  हाइलाइट्स

  16:37 (IST)

  1 जाने. 2000 ते 1 जाने. 2011 झोपडीधारकांना दिलासा
  'मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार'
  गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला निर्णय
  शासन निर्णय जारी झाल्यानं घराचं स्वप्न साकार होणार
  झोपडीच्या बदल्यात 2 लाख 50 हजारात मिळणार घर

  16:34 (IST)

  अरविंद केजरीवालांनी घेतली शरद पवारांची भेट
  देशातील विविध मुद्यांवर चर्चा - प्रफुल्ल पटेल
  'राजकीय परिस्थितीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली'
  दिल्ली सरकार आपल्या अधिकारासाठी लढलं - पटेल
  सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज - प्रफुल्ल पटेल
  केंद्र-राज्याच्या संघर्षाचा दिल्लीवर परिणाम - पटेल
  लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई - केजरीवाल
  'केंद्रानं दिल्ली सरकारचे अधिकार हिरावून घेतले'
  दिल्लीच्या नागरिकांवर अन्याय झाला - केजरीवाल
  केंद्रानं काढलेला अध्यादेश अयोग्य - केजरीवाल
  सर्व विरोधकांना एकत्र येण्याची विनंती - केजरीवाल
  राज्यसभेत बिल पास होऊ देणार नाही - केजरीवाल
  'भाजपकडून सर्व प्रकारच्या मार्गाचा अवलंब'
  तपास यंत्रणांद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न - मान
  देश वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं - भगवंत मान
  'देश संकटात असताना पवारांचा अनेकदा पुढाकार'
  राजभवन हे भाजपचं कार्यालय झालंय - भगवंत मान
  प्रत्येक शासकीय कामात केंद्राचा हस्तक्षेप - मान
  केजरीवाल, भगवंत मान यांचा केंद्रावर हल्लाबोल
  देशातील लोकशाही वाचवण्याची गरज - शरद पवार
  सध्या लोकशाहीवर आघात होतोय - शरद पवार
  ही समस्या फक्त दिल्लीची नाही तर देशाची - पवार
  राष्ट्रवादीचं अरविंद केजरीवालांना समर्थन - पवार
  बिलाविरोधात राष्ट्रवादी केजरीवालांसोबत - पवार

  16:4 (IST)

  कोल्हापूर - इचलकरंजीला नवीन आरटीओ कार्यालय
  'MH 51'नं वाहन नोंदणी सुरू होणार, सरकारची मंजुरी

  15:51 (IST)

  सोलापूर- विविध कामांचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
  सोलापूरच्या जनतेला सर्व प्रकल्प समर्पित - फडणवीस
  'सरकार आपल्या दारी उपक्रमाद्वारे नागरिकांना लाभ'
  नवीन सरकार आल्यानंतर गतिशील निर्णय - फडणवीस
  600 कोटींची योजना आता मार्गी लागली - फडणवीस
  'समांतर वाहिनीचा प्रश्न 18 महिन्यांत पूर्ण करणार'
  समांतर जलवाहिनीमुळे पाणीगळती थांबणार - फडणवीस
  महापालिकेनं 394 कोटींचा प्रस्ताव पाठवला - फडणवीस
  पिण्याच्या पाण्यासाठी निधी लवकर देणार - फडणवीस
  सोलापुरातील विमानसेवा लवकरच सुरू करणार
  सोलापूरकरांचे मनातील प्रश्न सोडणार - फडणवीस
  ठेकेदारांनी काम चांगलं न केल्यास कारवाईची सूचना
  पीएम आवास योजनेंतर्गत सोलापुरात जास्त घरं बनतील
  सरकारचं या वर्षी 10 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट
  राज्य सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले - फडणवीस
  'मुलींबाबत राज्य सरकारनं अनेक योजना सुरू केल्या'
  शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना - फडणवीस
  'योजनेतून आमच्या मुलांना काम मिळालं पाहिजे'
  आमचं कामं लांबवणारं सरकार नाही - देवेंद्र फडणवीस

  15:26 (IST)

  मोदींना विरोधासाठी हे सर्व एकत्र येतायत - फडणवीस
  पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास - देवेंद्र फडणवीस
  'भारताचा मानसन्मान परदेशात आहे ते आपण पाहिलंय'
  मोदींचं परदेशात स्वागत झाल्यानं मोठा सन्मान मिळाला

  14:54 (IST)

  बच्चू कडूंनी बोलवली तातडीची बैठक
  दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी नेमणूक
  अभियानाच्या नियोजनाबाबत बैठकीत होणार चर्चा
  6 जूनला मुंबईतून या अभियानाची होणार सुरुवात

  13:30 (IST)

  पुणे जिल्हा आषाढी वारीची आढावा बैठक संपन्न
  'प्रशासकीय पातळीवर समाधानकारक तयारी'
  'वारीबाबत समस्या सोडवण्यासाठी व्हॉट‌्सअॅप ग्रुप'
  बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

  8:50 (IST)

  आज पासून पुढील ९ दिवस नवतपा तापणार
  - विदर्भचा पारा ४६ अंशापार जाण्याची शक्यता
  - आवश्यकता नसेल तर दुपारी उन्हात जाणे टाळण्याचां सल्ला

  8:23 (IST)

  पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी
  पुण्यात टिंबर मार्केटला पहाटेपासून लागलेली आग अजूनही धुमसतच आहे. लाकूड फाटा, प्लायवूड फर्निचरची गोडाऊन असल्याने आग आटोक्यात आलेली नाही. 30 बंब आग आटोक्यात आणण्याचं काम करत आहेत.

  8:15 (IST)

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एनआयए’चं पथक आज नागपूरात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ११० कोटींची खंडणी आणि घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली होती.  पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात हे पथक तपास करणार असल्याची माहिती समजते.

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स