Live Updates : एकनाथ शिंदेंनी बोलावली शिंदे गटाच्या खासदारांची बैठक

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | May 23, 2023, 11:16 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 13 DAYS AGO

    हाइलाइट्स

    18:51 (IST)

    पुणे-मेहकर एसटी आणि ट्रक अपघात प्रकरण
    दुर्घटनेत 6 जण मृत्युमुखी, 10 जण जखमी
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त
    'मृतांच्या वारसांना एसटीतर्फे 10 लाख रु. द्यावेत'
    जखमींवर शासकीय खर्चानं उपचाराच्या सूचना

    18:23 (IST)

    अरविंद केजरीवाल 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
    रात्री 10 वा. मुंबई विमानतळावर होणार आगमन
    केजरीवाल उद्या दु.3 वा. उद्धव ठाकरेंची भेट घेणार
    25 मे रोजी केजरीवाल शरद पवारांची घेणार भेट
    भाजपविरोधात एकजूट बनवण्यासाठी चर्चेची शक्यता

    18:3 (IST)

    ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींची धडक
    वन अधिकारासाठी श्रमजीवी कष्टकऱ्यांचा 'पुरावा मोर्चा'
    'प्रलंबित प्रश्नांबाबत 7 दिवसांत सर्व संबंधितांची बैठक'
    जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं प्रशासनाचं आश्वासन

    17:58 (IST)

    बुलढाण्याच्या खामगाव नाफेड केंद्रावरील प्रकार
    नाफेड केंद्रावर मोजला जातोय व्यापाऱ्यांचा हरभरा
    न्यूज18 लोकमतच्या कॅमेऱ्यात अधिकाऱ्यांची कबुली कैद

    17:53 (IST)

    कराड, उंब्रज परिसरात वादळी वाऱ्यास मुसळधार
    विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी
    उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
    पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी उपयुक्त पाऊस

    17:12 (IST)

    उद्धव ठाकरेंचा पक्ष आधीच अंडरग्राऊंड - बावनकुळे
    '2024 पर्यंत ठाकरेंचा पक्षच अंडरग्राऊंड झालेला दिसेल'
    चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला

    17:1 (IST)

    राज्य शिखर समिती बैठकीत महत्त्वाचा निर्णय
    पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास
    विकास आराखड्याला शिंदे-फडणवीसांची मान्यता
    गर्दी होणाऱ्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करावं - मुख्यमंत्री
    पंढरपूर शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी - मुख्यमंत्री
    नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा निधी - मुख्यमंत्री

    16:22 (IST)

    राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
    राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात - सूत्र

    15:59 (IST)

    काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव
    'मित्रपक्षाकडून मोठा-छोटा असं भाष्य करू नये'

    15:31 (IST)

    यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
    यूपीएससी निकालात मुलींची बाजी
    इशिता किशोर देशात पहिली
    गरिमा लोहिया देशात दुसरी
    उमा हरती देशात तिसरी
    ठाण्याची कश्मिरा संख्ये राज्यात पहिली, देशात 25 वी

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स