LIVE Updates : अनिक्षा जयसिंघानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 17, 2023, 15:32 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    22:28 (IST)

    अनिल जयसिंघानी प्रकरणी तपास सुरू - मुख्यमंत्री
    अनिल जयसिंघानी सर्व पक्ष फिरलाय - मुख्यमंत्री
    अनिल जयसिंघानीची चौकशी होईल - एकनाथ शिंदे
    कोणी पाठीशी असतील याचा शोध लागेल - मुख्यमंत्री

    22:26 (IST)

    रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती
    अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार
    आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांची विधानसभेत घोषणा

    22:7 (IST)

    इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा 14 वा दिवस
    आजपासून आमचं आंदोलन मागे घेतोय - जलील
    नामांतराची लढाई कोर्टात लढायची गरज - जलील
    'भडकाऊ भाषण केल्यास आम्हीही योग्य उत्तर देऊ'
    रस्त्यावरील लढाईपेक्षा न्यायालयीन लढाई लढू - जलील

    20:40 (IST)

    भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय
    ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वन-डे जिंकली
    भारताकडून ऑस्ट्रेलिया 5 विकेट्सनं पराभूत
    लोकेश राहुल-रवींद्र जाडेजा विजयाचे शिल्पकार
    लोकेश राहुलची नाबाद 75 धावांची दमदार खेळी
    अष्टपैलू जाडेजाची नाबाद 45 धावांची संयमी खेळी

    19:24 (IST)

    कालच्या चर्चेच्या अनुषंगानं उत्तर दिलं - जे.पी. गावित
    शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही - जे.पी. गावित
    'मुख्यमंत्र्यांचे आमच्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश'
    अंमलबजावणीपर्यंत आम्ही वाट पाहणार - जे.पी. गावित
    'तो अहवाल आल्यानंतर आम्ही निघू, तोपर्यंत मुक्काम'
    आमच्या हाती कॉपी मिळाली नाही, उद्या मिळेल - गावित
    त्यानंतर चर्चा करून निर्णय होईल - जे.पी.  गावित

    19:5 (IST)

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर
    हंसराज अहिर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

    18:57 (IST)

    विधानपरिषदेची विशेष अधिकार समिती जाहीर
    समिती हक्कभंग सूचनांवर करणार कारवाई
    अध्यक्षपदी भाजप आमदार प्रसाद लाडांची नियुक्ती

    18:10 (IST)

    मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत निवेदन
    शिष्टमंडळाशी काल सविस्तर चर्चा - मुख्यमंत्री
    शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या - मुख्यमंत्री
    हे सरकार संवेदनशील सरकार - एकनाथ शिंदे
    उपाययोजना सुरू केल्या, निर्णयही घेतले - शिंदे
    'देवस्थान आणि गायरान जमिनी नियमित कराव्यात'
    'त्यासाठी वनहक्क असे अनेक दावे आणि प्रश्न होते'
    'अतिक्रमण रोखण्यासाठी योग्य अंमलबजावणी करा'
    'शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य'
    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती स्थापन -मुख्यमंत्री
    समिती महिनाभरात अहवाल देईल - एकनाथ शिंदे
    अंगणवाडी सेविकांचं वेतनही आपण वाढवलं - शिंदे
    '20 हजार अंगणवाडी सेविकांची रिक्तपदं भरणार'
    आशा स्वयंसेविकांनाही वेतनवाढ देणार - मुख्यमंत्री
    विधवा पेन्शन योजनेत वयाची अट बदलली - मुख्यमंत्री
    '14 मुद्दे होते, त्यापैकी कांदा हादेखील एक होता'
    कांद्याचं सानुग्रह अनुदान वाढवलं - एकनाथ शिंदे
    शेतकऱ्यांचं हित पाहून सरकारचा निर्णय - मुख्यमंत्री
    सर्व निर्णयांच्या अंमलबजावणीचे आदेश - मुख्यमंत्री
    'सर्व जिल्हाधिकारी तात्काळ अंमलबजावणी करणार'
    'कर्जमाफीत आदिवासी वंचित होते त्यांचाही समावेश'
    लॉंग मार्च मागे घ्यावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन

    17:31 (IST)

    अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्क होणार - फडणवीस
    मेगा टेक्स्टाईल प्रकल्पाला मान्यता - फडणवीस
    कापूस उत्पादकांना फायदा होणार - देवेंद्र फडणवीस
    तीन लाख लोकांना रोजगार मिळणार - फडणवीस

    16:22 (IST)

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडेंची तडकाफडकी बदली, अंबाबाईदेवीच्या मूर्तीसंदर्भात आलेल्या बातम्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईकवाडेंकडून पदभार काढल्याची चर्चा, मंदिरात कॅमेरा बंदीनंतर आता सचिवांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली बदली

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स