मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कुठे ईव्हीएम बंद तर कुठे राडा, ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचे दुपारपर्यंतचे अपडेट्स

कुठे ईव्हीएम बंद तर कुठे राडा, ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचे दुपारपर्यंतचे अपडेट्स

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान (gram panchayat election 2021) होत आहे. ठिकठिकाणी शांतेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान (gram panchayat election 2021) होत आहे. ठिकठिकाणी शांतेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान (gram panchayat election 2021) होत आहे. ठिकठिकाणी शांतेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.

  • Published by:  sachin Salve

 

मुंबई, 15 जानेवारी : राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान (gram panchayat election 2021) होत आहे. ठिकठिकाणी शांतेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव, चांदवडमध्ये मशीन बिघाड झाल्याचे समोर आले. तर दौंडमध्ये मतदान केंद्राबाहेरच हाणामारीची घटना घडली आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागातील मालेगाव,येवला,नांदगाव, चांदवड,बागलाण आणि देवळा या 6 तालुक्यातील 330 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. मनमाडच्या पानेवाडीला ईव्हीएम मशीनमधून उमेदवाराचे नाव गायब होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. अखेर मशीन दुरुस्त केल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी आणि कऱ्ही,अमोदे, ख़िरडी व ढेकुमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे 2 तास मतदान प्रक्रिया बंद होती. येवला,मालेगाव येथे ही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे समोर आले. सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते.

मात्र, 10 वाजेनंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या दुपारी 12 वाजे प्रयत्न 40 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार न घडता सध्या मतदान शांततेत पार पडत आहे. सर्व मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे मतदानाच्या आदल्यारात्री मद्यपान

बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचारी हे मद्यपान करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवार आणि गावकऱ्यांना लक्षात आल्याने सदरील मतदान केंद्रावर जात कर्मचाऱ्यांना मद्यपान करत असतांना रंगेहात पकडले.

ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू असून त्यात माजलगांव तालुक्यातील मोगरा मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात होते नियुक्त कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दौंडमध्ये कुसेगाव मतदान केंद्रावर राडा

दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. कुसेगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये अचानक वाद पेटला. तुफान हमरा-तुमरीचे रूपांतर भांडणात झाले आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन गटातील बाचाबाची थांबली.

मात्र, हा सगळा प्रकार मतदान केंद्राच्या आवारात झाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता. मात्र, याला कुठे तरी तडा गेल्याचे दिसून आले. सध्या कुसेगाव येथे सुरुळीत मतदान सुरू असले तरी भांडणानंतर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणावाचे वातावरण झाले होते. अद्याप या प्रकरणाचे कारण समजू शकले नाही.

भिवंडीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये राडा

तर भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान होत असताना सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये  चांगलाच राडा झाला असून एकमेकांची डोकी फोडण्यात आली आहे. यामध्ये  काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे सुनील हरड, कैलास पाटील यांच्या मध्ये चांगलाच राडा झाला असून यामध्ये पाच जण जखमी झाल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्यात मतदान करण्यासाठी मोठी गर्दी

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत बघायला मिळतेय. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीची पैकी 53 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आज 704 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडतंय. 5 हजार 796 सदस्य निवडून देण्यासाठी नागरीक आज मतदान करताहेत. 13 हजार 194 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात 2553 मतदान केंद्रावर आज मतदान पार पडत असून जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायत संवेदनशील आहेत. सकाळी मतदान करण्यासाठी गर्दी कमी होती आता मात्र बहुतेक गावात मतदान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

बीडमध्ये किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान

बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायत पैकी 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया किरकोळप्रकार वगळता शांततेत पार पडत आहे. 1 वाजेपर्यंत 47 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे, जिल्ह्यात 424 केंद्रावर मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदानासाठी कर्मचारी अधिकारी नियुक्त केल्याने मतदान सुरळीत सुरू आहे. 80 हजार मतदार बजावनार मतदानाचा हक्क बजावत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत मतदान सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढण्याची शकता वर्तवली जात आहे.

कोरोना काळातही रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 

रत्नागिरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सकाळी साडेसात पासून संथ गतीने सुरू झाली. 914 प्रभागातून 4338 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 986 मतदान केंद्रांवर 4 लाख 59 हजार 121 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 2 लाख 37 हजार 498 स्त्री मतदार आणि 2 लाख 21 हजार 613 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

First published:

Tags: Gram panchayat