LIVE Updates : येत्या 5 ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु होणार

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | September 03, 2022, 17:22 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 9 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    17:30 (IST)

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सहकुटुंब  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच नरेंद मोदी यांच्या सदिच्छा भेटीला गेले.

    17:19 (IST)

    - येत्या 5 ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु होणार

    - आठवड्यातून पाच दिवस ही विमानसेवा असेल

    - कोल्हापूर-गोवा आणि कोल्हापूर-बंगळुरु ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल

    14:27 (IST)

    नाशिक - मंत्री गिरीश महाजन सिन्नर दौऱ्यावर
    गिरीश महाजनांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
    सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे हाहाकार
    नागरिकांनी महाजन यांच्यासमोर मांडल्या व्यथा
    सरस्वती नदीत उतरून महाजनांकडून पाहणी
    सोमवारी आर्थिक मदत दिली जाणार - महाजन   

    13:30 (IST)

    रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वाहतूक कोंडी
    कोकणात जाणारा रस्ता छोट्या वाहनांनी गजबजला
    माणगाव बाजारपेठ परिसरात वाहनांच्या लांब रांगा
    कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येत वाढ 

    12:15 (IST)

    भाजपाध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका
    'आमच्या कमळाला हिणवायला 'बाई' म्हणताय?'
    'बाई'मध्ये आई, ताई, आणि कडक लक्ष्मीपण आहे'
    'उरल्यासुरल्या पक्षाला 'पेंग्विन सेना' म्हणायचं का?'
    अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेही आहेत - शेलार

    12:10 (IST)

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत
    अजित डोवाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट 

    11:50 (IST)

    भाजपाध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका
    'आमच्या कमळाला हिणवायला 'बाई' म्हणताय?'
    'बाई'मध्ये आई, ताई, आणि कडक लक्ष्मीपण आहे'
    'उरल्यासुरल्या पक्षाला 'पेंग्विन सेना' म्हणायचं का?'
    अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेही आहेत - शेलार 

    10:2 (IST)

    आशिया कपमध्ये पुन्हा भारत X पाकिस्तान
    रविवारी दुबईत रंगणार 'हायव्होल्टेज' मॅच
    महामुकाबल्यासाठी टीम इंडिया पुन्हा सज्ज

    भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था
    ब्रिटनला मागे टाकत भारताची आगेकूच
    जगात भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था

    प्रसूती रजेविषयी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
    गर्भपातानंतरही 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा
    केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

    गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
    उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक नाही
    उद्या पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-गोरेगाव मेगाब्लॉक

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राज्यपालांच्या भेटीला
    अजित डोवाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
    राजभवनात भगतसिंह कोश्यारींची सदिच्छा भेट

    शिंदे सरकारचा मविआला आणखी एक धक्का
    'राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करा'
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यपाल कोश्यारींना पत्र
    शिंदे-फडणवीस सरकारकडून लवकरच नवीन यादी 

    9:0 (IST)

    शिंदे सरकारचा मविआला आणखी एक धक्का
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यपाल कोश्यारींना पत्र
    'राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करा'
    मविआची यादी रद्द करण्यासाठी राज्यपालांना पत्र?
    शिंदे-फडणवीस सरकार नवीन यादी पाठवणार? 

    7:19 (IST)

    भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था
    ब्रिटनला मागे टाकत भारताची आगेकूच
    जगात भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था
    भारतीय अर्थव्यवस्थेत 7 टक्के वाढ अपेक्षित 

    राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स