राज्यात सत्तेचा वाद मिटला पण आता मुख्यमंत्री कोण?

राज्यात सत्तेचा वाद मिटला पण आता मुख्यमंत्री कोण?

राज्यात सत्तेचा तिढा सुटल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याबदद्ल चर्चा सुरू झालीय. तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला अखेर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आता शिवसेना राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठीचा दावा करते आहे. सत्तेचा हा तिढा सुटल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याबदद्ल चर्चा सुरू झालीय. तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी काही नावं पुढे येतायत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.

बाळासाहेबांना वचन

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे वचन मी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेनेचे नेते संजय राऊत हेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वारंवार सांगत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. या सगळ्या घडामोडी घडत असताना मातोश्रीबाहेर आधी आदित्य ठाकरेंच्या नावाने बॅनर लागले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा दर्शवणारे बॅनर लागले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का या चर्चांना वेग आला.

अवघ्या राज्याचं लक्ष

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना कोणतं पद मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिन्ही प्रमुख नेत्यांकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

==================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 11, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading