Home /News /maharashtra /

Raj Thackeray Press Conference: 365 दिवसांची परवानगी कशी देऊ शकता, Raj Thackeray यांचा सवाल

Raj Thackeray Press Conference: 365 दिवसांची परवानगी कशी देऊ शकता, Raj Thackeray यांचा सवाल

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

    मुंबई, 04 मे: मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रभरातून आणि बाहेरुन ही आम्हाला फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. पण हे फक्त आमच्या बाबतीत का होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि करत नाही त्यांना मोकळीक देणार अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली. ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार असा इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला आहे. तसंच अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवानगी देताय, कशासाठी, कोणासाठी देताय. हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता नाही. दिवसभर जे 4 ते 5 वेळा बांग दिली जाते, जी लाऊडस्पीकरवरून देतात. ती जर परत त्यांनी दिली, तर आमची लोकं हनुमान चालीसा त्या-त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणार, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना 365 दिवस परवानगी देता ती कशासाठी? 45 ते 55 डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज असं राज ठाकरे म्हणाले. ''त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन'' जवळपास 90-92 ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली, असं राज ठाकरे म्हणालेत. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला. ''पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत'' महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. 365 दिवस दिवसभरात चार, पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा. ''विषय क्रेडिट घेण्याचा नाही'' पुढे राज ठाकरे म्हणाले की, हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे. मला क्रेडिट नको. आम्ही गोष्टी सांगितल्या, त्या अनेक मौलवींना समजला, सरकारमध्ये पोहोचला. पोलिसांनाही धन्यवाद, त्यांनाही नीट समजलं. हा सर्वसमावेशक प्रयत्न होता, लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या