मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Rajya sabha election Result 2022: जखमेवर चोळलं मीठ..! मनसेनं Tweet करुन शिवसेनेला डिवचलं

Rajya sabha election Result 2022: जखमेवर चोळलं मीठ..! मनसेनं Tweet करुन शिवसेनेला डिवचलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)  सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 11 जून: धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (BJP candidate Dhananjay Mahadik) यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी महाविकास आघाडीवर भारी पडल्याचं चित्र आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल', अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. संदीप देशपांडे यांचं डिवचणारं Tweet शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले. असा झाला नंबर गेम... राज्यसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं संजय राऊत- 41 प्रफुल्ल पटेल- 43 -2 ईम्रान प्रतापगडी- 44 - 3 संजय पवार- 33 भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मतं अनिल बोंडे- 48 पियुष गोयल- 48 धनंजय महाडिक 27 मतांचे समीकरण संजय पवार यांना मिळालेली मतं 33+2 = 34 संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली. धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं. 27+7+7 = 41 धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे. भाजपचा गेम चेंजर नंबर गेम भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि त्यांची पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच तटस्थ असलेल्या मनसे 1 आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. अशी एकूण 10 मतं भाजपला अतिरिक्तं मिळाली. या नंबर गेमने भाजपच्या तीनही उमेदवारांना जिंकून दिलं.
First published:

Tags: MNS, Sandeep deshpande

पुढील बातम्या