शहापूर, 15 मार्च : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. हे 'लाल वादळ' शमवण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आज सरकारतर्फे मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार यांची शेतकरी शिष्टमंडळासोबत बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीनंतरही काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी मोर्चा थांबविण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. उद्या (गुरुवारी) दुपारी 3 वाजता मुख्यंत्र्यांच्या उपस्थिती बैठक होणार आहे.
दोन तासांच्या चर्चेतही निर्णय नाही
आज सरकार आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये सलग दोन तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी मोर्चा थांबविण्यास नकार दिला. उद्या दुपारी 3 वाजता मुख्यंत्र्यांच्या उपस्थिती पुन्हा बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाशिम मैदानापर्यंत मोर्चा सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यावर ठाम आहे. बैठकीला संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावे. शेतकऱ्यांची सरकारच्या प्रतिनिधींसमोर अट. लाँग मार्च दरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लेखी टाईमबाँड करावा. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठकीत भूमिका.
शहापूरच्या तहसील कार्यालयात लाँग मार्च शिष्टमंडळ आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. उद्या दुपारी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. याच बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार उपस्थित होते. लाँग मार्चच्या शिष्टमंडळाकडून माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी एल कराड आणि अजित नवले बैठकीला हजर होते.
वाचा - दीपक सावंत शिंदेंच्या शिवसेनेत, प्रवेश करताच फोडलं ठाकरेंचं ते पत्र!
शेतकरी, कष्टकरी आदिवासी बांधव यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून (12 मार्च) दिंडोरी येथून पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. माकप किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून काल सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरु होती. यात पालकमंत्री दादा भुसे यांनी मागण्या मान्य करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडून आणू असे आश्वासन दिले. मात्र मोर्चेकरी आपल्या निर्णयावर ठाम होते अखेर लाँग मार्च पुढे नेण्याचा निर्णय एकमताने झाल्याचे समोर आले आहे.
शेतकरी का करतायेत आंदोलन?
शेतमालाचे पडलेले भाव आणि हक्काच्या वन जमिनीसाठी नाशिक येथून मुंबई पायी लाँग निघाला आहे. रविवारी सायंकाळी हा लाँग मार्च आरोग्य विज्ञान विद्यापीठ या परिसरात मुक्कामी होता. याच दिवशी सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने लाँग मार्च सुरूच ठेवण्याचा निर्णय मोर्शीकरांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नंतर नाशिक शहरात दाखल झाला. हा लाँग मार्च पेठ रोड, आरटीओ, आडगाव नाका, द्वारकामार्गे मुंबईकडे रवाना झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest