राज ठाकरेंच्या आणखी एका कट्टर समर्थकाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

राज ठाकरेंच्या आणखी एका कट्टर समर्थकाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका कट्टर समर्थकानं आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. नांदेडमधील मनसेचे माजी जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

नांदेड, 27 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका कट्टर समर्थकानं आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. नांदेडमधील मनसेचे माजी जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (27 ऑगस्ट) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी जाधव हे एक शेतकरी होते. कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचल्याचं म्हटलं जात आहे. राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झाल्यानं संभाजी जाधव गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

(वाचा :भरधाव ट्रकची दोन टेम्पोंना भीषण धडक, 15 जणांचा मृत्यू)

संभाजी जाधव हे नांदेडच्या डौर गावाचे रहिवासी होते. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यावेळी त्यांनी देखील शिवसेना सोडचिठ्ठी दिली आणि मनसेत प्रवेश केला. संभाजी जाधव यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये शोककळा पसली आहे.

(वाचा : राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्यानं केली आत्महत्या)

दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी ठाणे परिसरातही एका कट्टर मनसैनिकांनी आत्महत्या केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री उशिरा ही घटना घडली. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती आहे. प्रवीणनं स्वतःला जाळून घेत आपलं आयुष्य संपवलं. 'राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावली. यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे दुखावलो असून मी आत्महत्या करणार आहे', असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितलं होतं.  दरम्यान, प्रवीण आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जवळपास शेकडो पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यानं ईडीविरोधात अपशब्ददेखील वापरले आहेत.

(वाचा :चार्टर्ड विमान कोसळून लागली आग, दुर्घटनाग्रस्त विमानात होते 6 प्रवासी)

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

First published: August 27, 2019, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading