पेग बनवण्यासाठी तरुणाने केलं 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण, ग्लास भरला नाही म्हणून...

पेग बनवण्यासाठी तरुणाने केलं 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण, ग्लास भरला नाही म्हणून...

नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला, दारूचा ग्लास भरण्यासाठी केलं 7 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण.

  • Share this:

नागपूर, 19 फेब्रुवारी : हल्ली दररोज अपहरणाच्या बातम्या येत असताता. लहान मुलांचे अपहरण करून, त्यांच्या घरच्यांकडून खंडणी मागितली जाते. मात्र महाराष्ट्रातील नागपूरात एक भयंकर प्रकार घडला. एका दारुड्याने सात वर्षांच्या मुलाचे अपहरण केले, यामागचे कारण सर्वांना हादरून सोडणारे होते. पोलिसांनी मंगळवारी दारुड्याला अटक केल्यानंतर त्यानं या मुलाला फक्त ग्लासात भरण्यासाठी अपहरण केल्याचे कबुल केले. हे कारण ऐकल्यानंतर पोलिसही हादरून गेले. राधेश्याम रमती शर्मा असे या आरोपीचे नाव असून नागपूरातील वर्धमाननगर येथे घडला.

वाचा-Tik Tokच्या स्कल चॅलेंजमुळे सांगलीत विद्यार्थी जखमी, तुमची मुलं तर नाही करत चूक?

पोलिसांनी या अपहरणकर्त्यांला अटक केल्यानंतर, अपहरण करण्यात आलेला मुलगा त्याच्या घराजवळ खेळत होता, त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरून आला आणि त्याने त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवले, असे सांगितेल. त्यानंतर जबरदस्ती या मुलाला दारूचे ग्लास भरण्यास सांगितले. राधेश्याम या अल्पवयीन मुलाला घेऊन झुडुपात गेला होता, तेथे त्याने दारूची बाटली आणि एक ग्लास बाहेर काढला. त्याने मुलाला पेग बनवायला सांगितले, असे आरोपींनी मान्य केले.

वाचा-विवस्त्र धिंड काढणाऱ्या दलित महिलेला अखेर मिळाला न्याय, नऊजणांना सक्तमजुरी

दरम्यान, या मुलाने पेग बनवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने या मुलाला काठीने मारण्यास सुरुवात केली आणि तेथून निघून गेला आहे. तर, दुसरीकडे मुलाच्या पालकांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. काही वेळानंतर 7 वर्षांचा मुलगा त्याच्या बाबांना झुडपात पडलेला सापडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

वाचा-तेलंगणातल्या कृष्णाच्या स्वप्नात आले ट्रम्प, आता 6 फुट मूर्तीची करतो पूजा

पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. त्याच्यावर 363 (अपहरण) आणि बाल न्याय (मुलांचे संरक्षण आणि संरक्षण) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: February 19, 2020, 11:45 AM IST
Tags: alcohol

ताज्या बातम्या