काटोल पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

काटोल पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

काटोल येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

  • Share this:

नागपूर, 19 मार्च: काटोल येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजपने ही पोटनिवडणुक रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. विशेष म्हणजे केवळ भाजपच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी ही पोटनिवडणुक रद्द करण्यासाठी समर्थन दिले होते.

आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे काटोल येथे पोटनिवडणुक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. पण सर्वच पक्षांनी या पोटनिवडणुकीला विरोध केला होता. या सुनावणी दरम्यान कोर्टाने निवडणूक आयोगाला त्यांचे म्हणणे 2 आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये, असे भाजपने याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

2014च्या विधानसभा निवडणुकीत काटोलमधून भाजपकडून आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 3 ऑक्टोबर 2018 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला होता. 6 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

VIDEO: 'दाऊदच्या या अटीला तुम्ही मान्यता दिली असती का?'

First published: March 19, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading