नागपुरात 48 तासांत 10 जणांचा मृत्यू, उष्माघातानं बळी गेल्याचा संशय

नागपुरात 48 तासांत 10 जणांचा मृत्यू, उष्माघातानं बळी गेल्याचा संशय

नागपुरातलं तापमान आता पन्नाशी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शहरातील तापमानाचा पारा आता 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे.

  • Share this:

हर्षल महाजन

नागपूर, 29 मे : नागपुरातलं तापमान आता पन्नाशी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शहरातील तापमानाचा पारा आता 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. नागपुरात गेल्या 48 तासांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दहाही जणांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्युमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहेत.

पाहा :VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम

या ठिकाणी आढळले मृतदेह

नागपूर शहरातील शहीद उड्डाण पूल, गणेशपेठ पोलीस स्टेशन, सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयास अॅकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या शेजारील जागा, रामझुला परिसर, अशोक चौकातील फुटपाथ परिसरात अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. नागपूर शहरात अक्षरशः शरीर भाजून काढणारा कडाक्याचा उन्हाळा आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे  हवामान विभागानं विदर्भात रेड अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे महापालिकेनं दुपारी 1 ते 4 या वेळेत काम करू, नये असं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बगीचे 24 तास उघडे ठेवले जात आहेत. नागरिकांना जीवघेण्या उन्हापासून बचाव करण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहनंही महापालिकेनं केलं आहे.

पाहा : VIDEO : भाजप प्रवेशाबाबत धनंजय महाडिक म्हणाले...

VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या

First published: May 29, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading