मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed: नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जोरदार राडा, मतदान केंद्रावर भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी, VIDEO

Beed: नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जोरदार राडा, मतदान केंद्रावर भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी, VIDEO

Beed: नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जोरदार राडा, मतदान केंद्रावर भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Beed: नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जोरदार राडा, मतदान केंद्रावर भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

BJP NCP party activist clash in Beed: बीडमध्ये नगरपंचायत निवडणुकीदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचं पहायला मिळालं आहे.

बीड, 21 डिसेंबर : महाराष्ट्रातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nagar Panchayat Election voting) आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान बीडमध्ये (Beed) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी (clash between bjp ncp) झाली आहे. (NCP- BJP activist clash in beed)

पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

मतदान केंद्राच्या गेटवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

बीड जिल्ह्यात आज 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या 5 ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे. या 5 नगरपंचायतमध्ये एकूण 85 उमेदवार आहेत. त्यापैकी 20 जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. मात्र उर्वरित 65 जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल 216 उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर या मतदानाला सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत चालणार आहे.

वाचा : "पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का?" धनंजय मुंडेंचा घणाघात

पाच नगर पंचायतसाठी 65 जागांसाठी 216 उमेदवार निवडणूक रिंगणात

1) पाटोदा नगर पंचायत

एकूण जागा-17

ओबीसी आरक्षण स्थगित - 4

निवडणूक -13 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान..

तर यासाठी 44 उमेदवार भविष्य आजमावत आहेत

भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब अजबे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा लढत

राखीव 4 जागेसाठी- 18 जानेवारी मतदान

2) वडवणी

एकूण जागा - 17

ओबीसी - 4 जागा राखीव

13 जागेसाठी 21 डिसेंबर तारखेला मतदान

33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

यासाठी राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके ची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजपा महाविकास आघाडीत लढत होत आहे.

ओबीसीं राखीव 4 जागेसाठी 18 जानेवारीला मतदान

3) केज

एकूण जागा -17

ओबीसी - 4

13 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान

60 उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत.

केजमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना अंतर्गत लढत आहे..भाजपचा एकही उमेदवार नाही

ओबीसी राखीव 4 जागेसाठी 18 जानेवारी मतदान

वाचा : 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल

4)शिरूर (कासार)

एकूण जागा-17

ओबीसी राखीव-4

13 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान

37 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत

भाजप, महाविकासआघाडीत लढत आहेत.

माजी मंत्री सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब अजबे यांच्यात लढत आहे.

ओबीसी राखीव 4 जागेसाठी-18 जानेवारीला मतदान होत आहे.

5) आष्टी

एकूण-17

ओबीसी राखीव-4

13 जागेसाठी 21 डिसेंबर मतदान

42 उमेदवार भविष्य आजमावत आहेत.

भाजपा-राष्ट्रवादी मध्ये लढत आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब अजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उर्वरित 4 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे.

First published:

Tags: Beed, BJP, Election, NCP