मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Mumbai Rain : राज्यात पावसाचा काही जिल्ह्यात दिलासा मात्र मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धुवाँधार पाऊस होणार

Maharashtra Mumbai Rain : राज्यात पावसाचा काही जिल्ह्यात दिलासा मात्र मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धुवाँधार पाऊस होणार

राज्यातील विविध भागात पावसाने थोडी उसंत दिली आहे परंतु मुंबईत हलक्या सरी कोसण्याच्या शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील विविध भागात पावसाने थोडी उसंत दिली आहे परंतु मुंबईत हलक्या सरी कोसण्याच्या शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील विविध भागात पावसाने थोडी उसंत दिली आहे परंतु मुंबईत हलक्या सरी कोसण्याच्या शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 19 ऑगस्ट : राज्यातील विविध भागात पावसाने थोडी उसंत दिली आहे परंतु मुंबईत हलक्या सरी कोसण्याच्या शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Mumbai Rain) तसेच विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. 19) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, श्रावण सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. या आसाचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकणार आहे. पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीत कायम राहील. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

हे ही वाचा : पिकाची नोंद थेट शासन दरबारी; ’ई-पीक पाहणी' 2.0 झाली अधिक सोपी

राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. 19) पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित  राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.  विजांसह पावसाचा इशारा परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आला आहे

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही मुसळधार पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची सरासरी पाणीपातळी 92 टक्क्यांवर पोहचली आहे. गंगापूर धरण 94 टक्के भरल्याने त्यातून गोदावरी नदीत तीन हजार क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, मालेगांव, पेठ आणि नांदगांव तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धुळे, जळगांव आणि अहमदनगरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

हे ही वाचा : पुराच्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या अंगावर कोल्हापूरकरांनी काठीने पाडला 'पाऊस'; पाहा VIDEO

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची रिपरिप सुरू होती, परंतु कालपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. याशिवाय नाशिकमधील धरणांतून औरंगाबादेतील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं आणि गोदावरी खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडीतून तब्बल ४७ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं पैठण आणि शेवगांवला जोडणारा पूर पाण्याखाली गेला असून प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

First published:

Tags: Konkan, Monsoon, Mumbai rain, Rain fall, Rain flood

पुढील बातम्या