MPSC प्रकरणी मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा
MPSC परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचा झालेला उद्रेक लक्षात घेता मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे लवकरच मोठी घोषणा करू शकतात.
'विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये. सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत असून लवकरच योग्य निर्णय घेणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना आदेश देऊन विद्यार्थ्यांचे प्र्नं संवेदनशीलतेने हाताळा, असंही सांगितलं आहे. राज्याची कायदा सूव्यवस्था बिघडू देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकते, हे पाहता मुख्यमंत्री लवकरच करणार मोठी घोषणा.