Home /News /maharashtra /

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

Maharashtra Corona update: आज राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

    मुंबई, 22 मे: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेटही सातत्याने वाढत (Recovery rate increased) आहे. राज्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील कोरोना बाधित मृतकांच्या संख्या ही चिंता वाढवणारी ठरत आहे. कारण, दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. आज राज्यात 40294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 51,11,095 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 92.04 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 26,133 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या एकूण 3,52,247 सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात 682 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 290 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.57 टक्के इतका आहे. आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान? ठाणे मंडळ - 3,603 नाशिक मंडळ - 4,130 पुणे मंडळ - 6,652 कोल्हापूर मंडळ - 3,931 औरंगाबाद मंडळ - 983 लातूर मंडळ - 1,752 अकोला मंडळ - 2,996 नागपूर मंडळ - 2,086 एकूण - 26,133 "राज्यातले विरोधक हे एक प्रकारचं ब्लॅक फंगसच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा" - संजय राऊत सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात?  राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 54,198 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 28,232 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 25,337, नागपूर जिल्ह्यात 18,482, सोलापूर जिल्ह्यात 18,095 सक्रिय रुग्ण, सांगली जिल्ह्यात 17,918 तर सातारा जिल्ह्यात 17,696 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,27,23,361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,53,225 म्हणजेच 16.97 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,55,729 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 22,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या