Home /News /maharashtra /

BREAKING NEWS: Vishwajeet Kadam यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

BREAKING NEWS: Vishwajeet Kadam यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

Vishwajeet Kadam convoy car accident: पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे.

सांगली, 27 जुलै: सांगली जिल्ह्यातील (Sangli District) पलूस तालुक्यातील (Palus Tehsil) अंकलखोप येथे पुरग्रस्ताची पाहणी करत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. विश्वजीत कदम (MoS Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत असताना त्यावेळी अचानक गावातील एक इसम आडवा आल्याने त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. यानंतर रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीचे चालक आणि अन्य एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे दुसऱ्या गाडीत होते. पुराचे पाणी ओसरत असताना सांगलीकरांवर नवं संकट आता सांगलीकरांची चिंता नव्या संकटाने वाढवली आहे आणि ते संकट म्हणजे मगरींचे. होय, कारण गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील विविध भागांत मगर रस्त्यांवर, घरांच्या छतावर फिरताना दिसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. या महापुराने मगरी बाहेर पडल्या आहेत. अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत. जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. एका मगरी ने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव केले आहे. या मगरीचे व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Sangli

पुढील बातम्या