• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भास्कर जाधवांना धक्काबुक्की भाजपच्या अंगाशी, आशिष शेलार, भातखळकर यांच्यासह 12 आमदारांचं निलंबन

भास्कर जाधवांना धक्काबुक्की भाजपच्या अंगाशी, आशिष शेलार, भातखळकर यांच्यासह 12 आमदारांचं निलंबन

Maharashtra Monsoon Session: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.

 • Share this:
  मुंबई, 05 जुलै: पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) सुरुवात वादळी ठरली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. (12 BJP MLAs suspended for a year) निलंबित 12 भाजप आमदारांची नावे अतुल भातखळकर आशिष शेलार गिरिश महाजन संजय कुटे अभिमन्यु पवार पराग आळवणी योगेश सागर राम सातपुते नारायण कुचे बंटी भागडिया हरिष पिंपळे जयकुमार रावल तालीका विधान सभा अध्यक्ष भास्कर जाधवांसोबतच्या धक्काबुक्कीनंतर वरील भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. हेही वाचा- लेटरबॉम्बनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया काय झालं सभागृहात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित केले.
  Published by:Pooja Vichare
  First published: