मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पावसाळी अधिवेशनात 6 जुलैला होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सुत्रांनी दिली माहिती

पावसाळी अधिवेशनात 6 जुलैला होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सुत्रांनी दिली माहिती

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. सुत्रांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. सुत्रांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. सुत्रांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

मुंबई, 03 जुलै: पावसाळी (Monsoon session 2021) अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. या अधिवेशनात गेल्या वर्षीपासून रखडलेली विधानसभा अध्यक्षाची (Assembly Speaker) निवडणूक होणार आहे. 6 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान उद्या म्हणजेच 4 जुलैला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मतदार असलेल्या आमदारांना निवडणुकीत सहभागी होण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे.

काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी वरून काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा- धक्कादायक पत्रानंतर सचिन वाझेची पुन्हा चौकशी, होणार मोठा खुलासा?

अधिवेशनाची पूर्वतयारी

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईतील विधानभवानात पूर्व तयारी सुरू झाली आहे. अधिवेशनासाठी उपस्थित रहाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस सुरक्षा रक्षक आणि पत्रकार या सर्वांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याच RTPCR चाचणी करण्यासाठी आज आणि उद्या विधान भवनाच्या प्रांगणात राज्य सरकारकडून आयोजन करण्यात आलं आहे. कोविड 19 संसर्गाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असली तरी पावसाळी अधिवेशन कडक निर्बंधांसह येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे.

उद्या भाजप आमदारांची बैठक

विधी मंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची वसंत स्मृती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व 105 आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भाजपच्या वसंत स्मृती या दादरच्या कार्यालयात संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

First published:

Tags: BJP, Congress, Maharashtra, NCP, Shiv sena