Home /News /maharashtra /

पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, ठाण्यात वीकएंडला धोका; हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, ठाण्यात वीकएंडला धोका; हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस धुवांधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे.

    मुंबई, 12 जून : राज्यात गुरुवारी मान्सूनचं आगमन झालेलं असलं, तरी अद्याप धुवांधार पावसाला सुरुवात झालेली नाही. पण शनिवार, रविवारी या दोन्ही दिवशी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार वृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेधशाळेने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या 8 जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा (Orange Alert)जारी केला आहे. 13 जूनला मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिवशी कोकणातले सगळे जिल्हे आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे, नगर या भागांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवारचा दिवसही पावसाचा असेल आणि या दिवशी 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात अति जोरदार पाऊस पडू शकतो. वाचा - कोरोनाचं औषध मिळालं! पतंजलीने हजारो पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचा दावा येत्या 15 तारखेपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. कुठल्या 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट? मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा विदर्भात वादळी पाऊस शुक्रवारी विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. नागपूरला संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. सोमवारीसुद्धा पुणे, नगर, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो, असं भारतीय हवामान विभागाच्या मुंबई उपविभागाने जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजात म्हटलं आहे. अन्य बातम्या कॅन्सरग्रस्त रम्याला वाचविण्यासाठी मराठी IPS अधिकाऱ्याची धडपड, पण... शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल शासनाचे आदेश डावलून परीक्षा घेणाऱ्या पुण्यातील 'त्या' शाळेविरोधात फौजदारी कारवाई
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Monsoon, Mumbai rain

    पुढील बातम्या