Home /News /maharashtra /

शिवतीर्थावर नामकरण सोहळा..! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा जाणून घ्या अर्थ

शिवतीर्थावर नामकरण सोहळा..! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा जाणून घ्या अर्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचं. राज यांचे पुत्र अमित आणि सून मिताली यांना 5 एप्रिलला पुत्ररत्न झालं. अमित आणि मिताली यांच्या मुलाचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला.

मुंबई, 06 मे: कुटुंबात बाळाचं (Child) आगमन झाल्यावर त्याचं नाव काय ठेवायचं, यावर कुटुंबातल्या सदस्यांमध्ये चर्चा होत असते. आपल्या अपत्याचं नाव (Name) हटके, पण अर्थपूर्ण असावं, असा पालकांचा आग्रह असतो. त्यामुळे अशी नावx शोधण्यावर अनेक पालक भर देतात. सध्या अशाच एका चिमुकल्याचं नाव जोरदार चर्चेत आहे. अर्थात यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. हे नाव वेगळं आणि अर्थपूर्ण आहे आणि ते नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचं. राज यांचे पुत्र अमित आणि सून मिताली यांना 5 एप्रिलला पुत्ररत्न झालं. अमित आणि मिताली यांच्या मुलाचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. या छोटेखानी सोहळ्यात राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांचा पुत्राचं नाव `किआन` (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. किआन हे नाव काहीसं वेगळं वाटत असलं, तरी ते हिंदू धर्मातलंच आहे. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार `किआन` या नावामागे मोठा अर्थ असल्याचं जाणकार सांगतात. सध्या राजकीय, सामाजिक कारणांवरून राज ठाकरे जोरदार चर्चेत आहेत. अमित ठाकरे (Amit Thackeray) हेदेखील राजकारणात (Politics) सक्रिय झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे राज हे आजोबा आणि अमित हे वडील झाल्यामुळे त्यांच्यावर मोठी कौटुंबिक जबाबदारी आली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अमित आणि मिताली यांच्या पुत्राचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. या चिमुकल्याचं नाव `किआन` असं ठेवण्यात आलं आहे. आपल्याकडे बाळाचं नाव ठेवताना धार्मिक संदर्भ, राशी, नक्षत्रं आदी गोष्टी पाहिल्या जातात. `किआन` या नावामागेदेखील अनेक संदर्भ आहेत. किआन हे नाव हिंदू धर्मातलं (Hindu Religion) आहे. `किआन` या शब्दाचा अर्थ देवाची कृपा, राजेशाही (Royal), प्राचीन (Ancient) असा होतो. `किआन` या नावानुसार या चिमुकल्याची रास मिथुन (Gemini) असावी. `कि` या आद्यक्षरानुसार नक्षत्र मृगशीर्ष आहे. `कि` या आद्याक्षराव्यतिरिक्त वे, वो, का, की, बे, बो ही अक्षरंदेखील या नक्षत्राच्या आधिपत्याखाली येतात. मृग या नक्षत्राचा स्वामी मंगळ (Mars) हा ग्रह असतो. अंकशास्त्रानुसार या नावाचा शुभांक 9 आहे. या नावाच्या व्यक्तीसाठी पिवळसर, हिरवा, गुलाबी आणि पांढरा हे रंग शुभ असतात. पन्ना हे रत्न या व्यक्तींसाठी विशेष लाभदायी ठरतं. राणा दाम्पत्याविरोधात 'तो' गुन्हा दाखल करणं भोवलं; न्यायालयानं सरकारला सुनावलं किआन हे नाव असलेल्या व्यक्ती शिक्षक, प्राध्यापक, कवी, गीतकार, संगीतकार, प्रवचनकार, ज्योतिषी, गणितज्ञ होऊ शकतात. रसायनशास्त्र, अकाउंट्स, व्यवस्थापनशास्त्र, फायनान्स किंवा बॅंकिंग क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, अशी माहिती `झेल्थी डॉट कॉम`ने दिली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या