Home /News /maharashtra /

'शाब्बास एकनाथजी... नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता,' नारायण राणे यांची मोठी प्रतिक्रिया

'शाब्बास एकनाथजी... नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता,' नारायण राणे यांची मोठी प्रतिक्रिया

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज झाले असून समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत.

    मुंबई, 21 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज झाले असून समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. शिंदे यांच्या नाराजीनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकार संकटात आले असतानाच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी ट्विट करत या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.' असं ट्विट राणे यांनी केले आहे. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान आहेत. दिघे यांचे नाव घेत राणे यांनी या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केल्याचं मानलं जात आहे. शिवसेनेचे एकूण ३५ आमदार शिंदेसोबत असल्याचा दावा गुजरातमधील भाजपा नेत्यांनी केला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदार सूरतमध्ये असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता हा आकडा वाढत आहे. हा आकडा अतिशय मोठा असून भाजपचा हा दावा खरा असल्यास हा शिवसेनाला जबर धक्का असेल. शिवसेनेचा दावा काय? शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचा दावा केला आहे. 'एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही.' असा दावा शिंदे यांनी केला  आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Narayan rane, Shivsena

    पुढील बातम्या