Home /News /maharashtra /

बच्चू कडूंची यंदाची दिवाळी खास! वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान...पाहा VIDEO

बच्चू कडूंची यंदाची दिवाळी खास! वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान...पाहा VIDEO

अनेक निराधारांना राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मोठा आधार

    अमरावती, 13 नोव्हेंबर: प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू  (Maharashtra Minister Bacchu kadu) आपल्या हटके अंदाजामुळे प्रसिद्ध आहेत. मग ते आंदोलन असो अथवा समाजकार्य. आज धनत्रयोदशीला पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या हटके अंदाजाचा प्रत्यय आला आहे. सर्वत्र दिवाळीची (Diwali) धामधूम सुरू आहे. मात्र, जे लोक वृद्धाश्रमात (Old Age home) आपलं उर्वरित जीवन व्यतीथ करत आहेत. अशा वृद्धांसोबत बच्चू कडू यांनी खास दिवाळीचा आनंद लुटला. अमरावतीमधील  (Amaravati) मधुबन वृद्धाश्रमात बच्चू कडू यांनी जाऊन वृद्धांना सुगंधित उटणं लावून त्यांना स्वत: च्या हातांना अभ्यंगस्नान घातला. एवढंच नाही तर सर्वांना नवे कपडे दिले. महिलांना शॉल, साडीचोळी दिली. तसेच वृद्धांना पुरणपोळीचं जेवणही दिलं. हेही वाचा...Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा' बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी लवकर उठून मधुबन वृद्धाश्रम गाठलं. तेथील वृद्धांना सुगंधी उटणे लावून त्यांना स्वत: च्या अभ्यंगस्नान घातलं. सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी, शॉल दिली. सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण दिलं. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी स्वत: वृद्धांना वाढलं. यावेळी वृद्धांश्रमातील सर्वांचे डोळे पाणावले होते. बच्चू कडू यांची प्रहार संघटना विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांसाठी कार्य करते. दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात बच्चू कडू कायम अग्रेसर असतात. त्याचबरोबर अनेक निराधारांनाही बच्चू कडू यांनी मोठा आधार दिला आहे. दिवाळी म्हटली की आनंदाचा क्षण. आपण कुठेही असलो तरी दिवाळीसाठी कुटुंबात एकत्रित येतो व दिवाळी सण मोठ्या आनंदानं साजरा करतो. मात्र, वृद्धाश्रमातील दिवाळी ही वेगळीच असते. हेही वाचा...ताण वाढवणारे नव्हे ताण हलका करणारे! दिवाळीची मिठाई आणि फराळासाठी काही टीप्स लहानपणी ज्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्या आई-वडिलांनी काबाड कष्ट केले. तिच मुलं मोठी झाल्यानंतर आई-वडिलांना नाकारतात. अशा आई-वडिलांवर वृद्धाश्रमात राहाण्याची वेळ येते. पोटच्या पोरांनी या वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवलं. तिथे आज बच्चू कडू यांच्यासारख्या एका मंत्र्यांने दाखवलेला जिव्हाळा या वृद्धांच्या मायेची उब निर्माण करणारा ठरला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या