पवार Vs फडणवीस राजकीय लढाई, मातब्बर नेत्याला मोठा धक्का

पवार Vs फडणवीस राजकीय लढाई, मातब्बर नेत्याला मोठा धक्का

पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आल्यानंतर आता महाराष्ट्रातील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत आहे. हाती आलेल्या ताज्या कलानुसार महाराष्ट्रातील 48 पैकी 43 जागांवर महायुती आघाडीवर आहे तर अवघ्या 4 जागांवर आघाडी पुढे आहे.

यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता.

माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला. आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम महाराष्ट्रातील केवळ बारामती, शिरूर आणि सातारा या मतदारसंघातच राष्ट्रवादी पुढे आहे. तर माढ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील एकूण परिस्थिती पाहता हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण या निवडणुकीत शरद पवार हे अत्यंत आक्रमकपणे सक्रिय झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील आकडेवारी

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं.

VIDEO : प्रीतम यांच्या आघाडीनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading