'भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग'

'भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग'

गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • Share this:

जळगाव, 30 जून : 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षात राहायला तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या मुंबईतील बंगल्याावर त्यांच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात,' असा दावा करत भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. जळगावात झालेल्या भाजपच्या विस्तार सभेत गिरीश महाजन बोलत होते.

'आघाडीचे नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याने पुढे पाहू, असं म्हणून आपल्याला त्यांना टाळावं लागत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत,' अशी खोचक टीका गिरीश महाज यांनी केली आहे.

काय म्हणाले महाजन?

'पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा होत असतो. भाजपच्या 42 कार्यकर्त्यांचे कम्युनिस्टांनी खून केले आहेत. तरीसुद्धा कार्यकर्ते मागे हटले नाहीत. गेल्या निवडणुकीमध्ये आपण ठरवलेल्या आकड्यांपेक्षा जास्त जागा निवडून आल्याने आपल्याला सुद्धा धक्का बसला,' अशी कबुली गिरीश महाजन यांनी दिली.

विधानसभेआधी खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा?

भाजपच्या या विस्तारसभेत एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचं श्रेय इथं बसलेल्या कुणाचं किंवा मुख्यमंत्र्यांचं नाही,' असा टोला लगावत खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

खडसे यांना मंत्रिपदापासून दूर व्हावं लागल्यानंतर अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणातही त्यांच्या मनातली सल व्यक्त झाली. 'राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. तिथून ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले,' असं सांगत ते नशीबवान असल्याचं सांगायलाही खडसे विसरले नाहीत.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 3:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading