राज ठाकरे व्हिडिओ प्ले झालाच नाही, 'असा' फ्लॉप झाला मनसे फॅक्टर

राज ठाकरे व्हिडिओ प्ले झालाच नाही, 'असा' फ्लॉप झाला मनसे फॅक्टर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आल्यानंतर आता महाराष्ट्रातील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवानंतर राज ठाकरेंवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण राज यांनी मोदी सरकारविरोधात राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राज ठाकरेंनी कुठे घेतल्या सभा आणि त्या मतदारसंघात कोण आहे पुढे?

हातकणंगले - स्वाभिमानी Vs शिवसेना, शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा विजय

पुणे - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे गिरीश बापट विजयी

सोलापूर - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी

नाशिक - राष्ट्रवादी Vs शिवसेना, शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर

मुंबई- युतीचे सर्व उमेदवार विजयी

नांदेड - भाजप Vs काँग्रेस, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी

पनवेल (मावळ)- राष्ट्रवादी Vs शिवसेना, शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंचा विजय

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आल्यानंतर आता महाराष्ट्रातील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत आहे. हाती आलेल्या ताज्या कलानुसार महाराष्ट्रातील 48 पैकी 43 जागांवर महायुती आघाडीवर आहे तर अवघ्या 4 जागांवर आघाडी पुढे आहे.

यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता.

VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!

First published: May 23, 2019, 4:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading