महाराष्ट्रात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचाही चालला करिश्मा

महाराष्ट्रात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचाही चालला करिश्मा

राज्यात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही करिश्मा चालल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नागपूर, 23 मे :  लोकसभा निवडणूक 2019चे निकाल अखेर हाती आले आहेत. या निवडणुकीच्या निकालाची देशासहीत परेदशातही उत्सुकता होती. देशासह महाराष्ट्रातील जनतेनंही भाजप-शिवसेनेच्या युतीला आपला कौल दिला आहे. या निकालावरून भाजपचं काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं स्वप्नदेखील सत्यात उतरल्याचं दिसलं. निकालावरून राज्यात मोदी लाटेसहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही करिश्मा चालल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य लोकसभा निवडणूक 2019वर अवलंबून असल्यानं भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कोपरा-न-कोपरा गाठत दमदार प्रचार केला.

पाहा :VIDEO : आमच्यासाठी राज्यघटना सर्वोच्च, विजयानंतर मोदींचं UNCUT भाषण

राज्यात युतीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली सर्व ताकद पणाला लावली. याचा निकाल म्हणजे राज्यातील 41 जागांवर  युतीचे उमेदवार विजय झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019

भाजप : 41

काँग्रेस : 6

वंबआ : 1

लोकसभा निवडणूक 2019

भाजप : 353 जागा

काँग्रेस : 91 जागा

इतर : 98

देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि जनतेचा विजय आहे, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.

वाचा Analysis : नितीन गडकरींना नागपूरात जात फॅक्टरचा फटका बसला का?

VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

First published: May 23, 2019, 11:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading