बारामती : 'ही' आकडेवारी पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार की आणखी मजबूत करणार?

बारामती : 'ही' आकडेवारी पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार की आणखी मजबूत करणार?

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राष्ट्रवादीसमोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

बारामती, 9 मे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. पण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राष्ट्रवादीसमोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं बोललं जात आहे. यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल या आमने-सामने आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठीची राज्यातील मतदान प्रक्रिया संपली आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचं आता विश्लेषणही सुरू झालं आहे. बारामती मतदारसंघात 2014 च्या तुलनेत यावेळी दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ झाली आहे.

बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत 58. 83 टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी 61. 58 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. बारामती मतदारसंघात आता वाढलेली दोन लाख 32 हजार 829 मते निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते नेमकी कुणाच्या बाजूने झुकतात, यावर या मतदारसंघातील विजयाचं गणित ठरू शकतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना आव्हान करण्यात आलं आहे. त्यामुळे मतदारांनी मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला की राष्ट्रवादीच्या पाठिमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

बारामती आणि राष्ट्रवादी

शरद पवार हे आधी स्वत: या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी हा मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळे यांना सोडला. आणि ते स्वत: माढ्यातून लढले.

2009 च्या निवडणुकीत तर सुप्रिया सुळे यांनी इथून एकहाती विजय मिळवला. पण 2014 च्या निवडणुकीत चित्र काहीसं बदलेलं पाहायला मिळालं. राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुती झाली. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचारही होताच. या सगळ्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचे घटकपक्ष असणाऱ्या महादेव जानकर यांच्या रासपकडे गेला होता आणि स्वत: जानकर हे इथून महायुतीचे उमेदवार होते. आघाडी सरकारविरोधात असणारी अन्टी-इन्कबन्सी आणि मोदी लाट या सगळ्याचा अपेक्षित फायदा महादेव जानकर यांना झाला. जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काही विधानसभा मतदारसंघात तर आघाडीही मिळाली. जानकर राज्यातील क्रमांक एकचे जायंट किलर ठरणार का? अशी जोरदार चर्चाही रंगू लागली. पण अखेर सुप्रिया सुळेंना त्यांच्याविरोधात 69 हजार मतांनी निसटता विजय मिळवला.

या मतदारसंघात येणार विधानसभा मतदारसंघ

बारामती

दौंड

इंदापूर

पुरंदर

भोर

खडकवासला

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे नाशिकमध्ये पुन्हा इंजिन येईल ट्रॅकवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading