बारामती मतदारसंघात मोठी घडामोड, विजयसिंह मोहितेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट

बारामती मतदारसंघात मोठी घडामोड, विजयसिंह मोहितेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, इंदापूर, 8 एप्रिल : माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून विजयसिंह मोहिते पाटलांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन यांची अजित पवार आणि राष्ट्रवादी यांच्यावरील नाराजी लपून राहिलेली नाही. या पार्श्वभूमी झालेल्या या भेटीमुळे बारामतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांची नाराजी लक्षात घेता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना भेटीसाठी बोलवलं होतं. पण आज झालेल्या हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील भेटीमुळे पुन्हा एकदा बारामतीत नव्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.

अजित पवार हर्षवर्धन पाटील भेट

लोकसभा निवडणुकीचं मतदान जसं जवळ येत आहे तसं प्रचार आणि राजकीय समिकरणांची फेरजुळवणी होत आहे. बारामती मतदारसंघात कुठलीही कसर राहू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं.

पवार पाटील मतभेद

इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि बारामतीचे अजित पवार यांचे राजकीय हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी बेहत्तर पण इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असे म्हणणारे अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांच्या यांच्या दारात गेले. निवडणुकीदरम्यानची दादांची ही डरकाळी इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती.

विधानसभेला फटका

लोकसभेला राष्ट्रवादीचे काम करायचे आणि विधानसभेला मात्र काँग्रेसला मदत करायची नाही असं चालणार नाही असं काँग्रेसने सांगितले होते. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? असाही सवाल काँग्रेसच्या नेत्यांचा होता. त्याचं कारण म्हणजे विधानसभेत राष्ट्रवादीने मदत केली नसल्याने हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading