'मी म्हणजे पार्थ पवार, मी म्हणजे अमोल कोल्हे'

'मी म्हणजे पार्थ पवार, मी म्हणजे अमोल कोल्हे'

पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या प्रचारसभेत उदयनराजेंनी मोदी सरकारवही जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 14 एप्रिल : 'मी म्हणजे पार्थ पवार, मी म्हणजे अमोल कोल्हे,' असं म्हणत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या प्रचारसभेत उदयनराजेंनी मोदी सरकारवही जोरदार हल्लाबोल केला आहे. 'कशाला पाहिजेत हे दलाल यांनी देश विकला. बहुमत देताना तुमची जी भावना होती की ते नोकरी देतील, 15 लाख देतील, हे सगळं मी शक्य करून दाखवीन. मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही,' असं म्हणत उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी केली.

मावळमध्ये होणार जोरदार लढत

राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून पार्थ अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. आता जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत शिवसेनेकडून बारणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढत आहेत.

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसेच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

SPECIAL REPORT : विनायक मेटेंच्या खेळीने मुख्यमंत्री फडणवीस संतापले

First published: April 14, 2019, 7:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading