सोलापुरातील भाजप उमेदवाराची सभा, युवकाने गावातील समस्या सांगताच उडाला गोंधळ

सोलापुरातील भाजप उमेदवाराची सभा, युवकाने गावातील समस्या सांगताच उडाला गोंधळ

एकीकडे नागरिक आपल्‍या समस्‍या सांगत असताना प्रचारसभेसाठी आलेले नेते मात्र स्टेजवरच आईस्‍क्रीम खाण्‍यात दंग होते.

  • Share this:

सोलापूर, 9 एप्रिल : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या सभेत गोंधळ निर्माण झाला. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथे महास्वामी यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्‍यात आलं होतं. यावेळी एका युवकाने गावातील विकास कामांबद्दल प्रश्न विचारल्याने सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंढरपूरमधील प्रचारसभेत जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या भाषणावेळी एका युवकाने गावातील समस्‍या सांगत भरसभेत गोंधळ घातला. यामुळे भाजपची ही सभा आटोपती घेण्‍यात आली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी युवकाची समजूत काढून त्याला शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला.

एकीकडे नागरिक आपल्‍या समस्‍या सांगत असताना प्रचारसभेसाठी आलेले नेते मात्र स्टेजवरच आईस्‍क्रीम खाण्‍यात दंग होते. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांवर मोठी टीका होत आहे.

वर्धातही भाजपच्या सभेत गोंधळ

वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमरावतीच्या जरूड इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका तरूणाने आमदार अनिल बोंडे यांना विकासकामासंदर्भात काही प्रश्न विचारल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला.

मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा? असा प्रश्न भाजपच्या प्रचारसभेत विद्यमान खासदार रामदास तडस आणि भाजप आमदार डॉ अनिल बोंडे यांना एका तरुणाकडून विचारण्यात आला. त्यानंतर या प्रचारसभेत गोंधळ उडाला. या गोंधळानंतरही नेत्यांनी आपली भाषणं सुरूच ठेवल्याचंही पाहायला मिळालं. ज्या तरुणानं विकासाची अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात येत आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : पार्थसाठी राज ठाकरे घेणार सभा? अजित पवार म्हणतात...

SPECIAL REPORT : अनिल गोटेंचं बंड, भामरेंविरोधात थोपडले दंड!

VIDEO : विखे पाटील भाजपात जाणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...

VIDEO : पार्थसाठी राज ठाकरे घेणार सभा? अजित पवार म्हणतात...

First Published: Apr 9, 2019 07:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading