कल्याण लोकसभेत EVM च्या नोंदणीचा घोळ? शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह

कल्याण लोकसभेत EVM च्या नोंदणीचा घोळ? शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह

कल्याण लोकसभेसाठी 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यानंतर ईव्हीएम मात्र तब्बल 23 तासांनंतर स्ट्राँग रूममध्ये पोहचल्या

  • Share this:

कल्याण, 1 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपलं असलं तरीही राजकारण अजूनही तापलेलं आहे. कल्याणमध्ये ईव्हीएमवरून निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मतदानाच्या तब्बल 23 तासांनंतर मशिन्स स्ट्राँग रूममध्ये पोहचल्याने शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण लोकसभेसाठी 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यानंतर ईव्हीएम मात्र तब्बल 23 तासांनंतर स्ट्राँग रूममध्ये पोहचल्या, असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे शिवसेनेकडून निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

शरद पवारांचंही ईव्हीएमवर भाष्य

'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला होता.

याबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?'

'...तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल'

'ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो,' असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

First published: May 1, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading